पैसा टिकवायचा असेल तर तुमच्या आणि घरात करा हे महत्वाचे बदल...


इच्छा असूनही तुम्ही जर बचत करू शकत नसाल तर समजावे की, तुमच्या घरातील तिजोरी व पैशांचे कपाट योग्य जागी ठेवलेले नाही. 

जर तुमच्याकडे तिजोरी व कपाट हलविण्यासाठी पर्याय उपलब्ध नसेल तर वास्तुशास्त्र व फेंगशुईमधील खालील उपाय योजून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

जर भरपूर पैसा येऊनही तो नाहक खर्च होत असेल, तर दक्षिणेकडे असणाच्या तिजोरीवर पर्वतदृश्याचे चित्र लावा; परंतु या चित्रात पाण्याचे दृश्य नसावे.

घराच्या उत्तर दिशेकडील भागामध्ये गोल्डन टेंपलचे चित्र व निळ्या रंगाचे पेंटिंग लावावे.

तिजोरीमध्ये ज्या कप्यात तुम्ही पैसे ठेवता तेथे आरसा ठेवावा म्हणजे धन दुप्पट होते. घराच्या दक्षिण, पश्चिम उत्तर - पश्चिम व दक्षिण - पश्चिम भागात आरसा लावावा.

घराच्या सुखसमृद्धीसाठी किमती वस्तू पैसे हे घराच्या दक्षिण - पश्चिम भागामध्ये ठेवावेत.

कधीकधी वापरण्यात येणारे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे या वस्तू उत्तरेकडे उघडणाच्या तिजोरीत व कपाटात ठेवाव्यात.

प्रवेशद्वार व खिडकीजवळ तिजोरी / पैशांचे कपाट नसावे. तिजोरी / कपाट येणाच्या जाणा-यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.

ज्या जागी तिजोरी / पैशांचे कपाट असेल तेथे भंगार सामान ठेवू नये. नाहीतर धनाच्या आगमनाचा मार्ग रोखला जातो.

धनाचे आगमन सुरळीतपणे होत राहावे यासाठी घराच्या दक्षिण भागात देवघर नसावे.
थोडे नवीन जरा जुने