दैनंदिन जीवनात हे आहेत कोरफडीचे फायदे जाणून घ्या !


आरोग्यासाठी कोरफड हितावह मानली जाते. कोरफडीचे अनेक फायदे दैनंदिन जीवनातही आपण करू शकतो. कोरफडीचा गर,रस हा उपयुक्त असून केस, त्वचा व कफ विकारावर कोरफड गुणकारी आहे.कोरफड ही चवीला कडवट असली, तरी कोरफडीच्या रसामध्ये गूळ किंवा साखर समाविष्ट करून प्यायल्यास खोकल्यासाठी गुणकारी ठरते.

घरगुती उपचार म्हणून कोरफड भाजून आतील गराच्या रसात गूळ-साखर एकत्र करून मोठय़ांसाठी अथवा लहानांसाठी देखील प्यायला दिल्यास खोकला, कफ कमी होऊ शकतो.


कोरफडीमध्ये ए, सी, बी, बी२, बी३, बी६, फॉलिक अ‍ॅसिड असते, तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे शरीरास पोषक ठरतात.

चमकदार केसांसाठी कोरफडीचा उपयोग होतो, तर सौंदर्यवर्धक जेल, फेसवॉश, क्रीमसाठी कोरफड उपयुक्त आहे. घरगुती उपचार म्हणून चेह-यासाठी कोरफडीचा गर लावल्यास त्वचा चमकदार बनते.
थोडे नवीन जरा जुने