घर बांधत असताना 'ह्या' नियमांचे पालन केलेच पाहिजे !स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक जीवनभर राब राब राबतात; परंतु असे करुनही काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही; किंवा घर अपूर्ण असतानाच ते विकण्याची वेळ त्यांच्यावर येते. 


कधीकधी घर पूर्ण झाले तरी त्यांना त्यात राहण्याने सुख लाभत नाही. या प्रकारच्या समस्यासाठी त्या घरातल वास्तुदोष जबाबदार असतात. घर बांधताना काही दक्षता घेतली तर हे वास्तुदोष व समस्या टाळता येतात.

रविवारी व मंगळवारी घराचे बांधकाम सुरू करू नये. प्रत्येक महिन्याच्या ४, ९, १४ या रिक्त तिथींवर बांधकाम सुरू करु घराचे बांधकाम सुरू करताना कुंडलीतील गुरु जर अस्त, कमजोर वा नीच राशीमध्ये स्थित असेल तर घर बांधण्याचे काम सुरू करू नये. नाहीतर धनहानी होते.

घराचे बांधकाम सुरु करण्याच्या दिवशी सूर्य व चंद्र हे ग्रहही अस्त, नीच व कमजोर असणे शुभ मानले जात नाही. या स्थितीत घराचे बांधकाम सुरू केल्यास गृहस्वामी व गृहस्वामिनीच्या जीवनामध्ये संकटे निर्माण होतात. 

शनिवारी पूर्वाभाद्रपद, उत्तरा भाद्रपद, ज्येष्ठा, अनुराधा, स्वाती वा भरणी नक्षत्र असेल तर घराचे बांधकाम सुरू करू नये. नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो.
थोडे नवीन जरा जुने