आपले डोळे बरेच काही बोलत असतात...डोळे आपल्या भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम असतात. आपण आपल्या भावना कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी डोळे लपवू शकत नाही. डोळ्यांतून आपल्या भावना व्यक्त होतातच. 


त्यामुळेच अनेकदा डोळे बोलतात असा शब्दप्रयोगही आपण सहज वापरतो. आपल्या मनात आणि शरीरात सुरु असणारी खळबळ आपल्या डोळ्यातून व्यक्त होत असते.


वाईट गोष्टी पाहिल्यावर डोळे लगेच बंद होतात. 

द्वेपदेखील डोळ्यांतून व्यक्त होतो.

आनंदाचा अनुभव घेताना डोळे हळुवारपणे बंद होतात.

मनात संशय आला की डोळे डावीकडे वळतात.

मनात अविश्वास असेल तर आपण डोळे वर करतो. दोन्ही डोळे वर करून पाहणा-या व्यक्ती दिवास्वप्न बघत असतात.


डोळ्यांच्या कोप-यातून खाली पाहणे अहंकाराचे लक्षण आहे. मन अस्वस्थ असेल, तर नजर भिरभिरणारी असते , ती स्थिर नसते.
थोडे नवीन जरा जुने