जाणून घ्या ! ‘घरचे लोणी’ आरोग्यासाठी चांगले की वाईट?कोलेस्टेरॉलच्या भीतीने घरातील लोण्यापासून अनेकजण लांब राहतात, परंतु काही प्रमाणात लोणी खाणे चव आणि आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

देशाच्या ग्रामीण भागात ताकापासून लोणी तयार करून खाण्याची पद्धत हजारो वर्षांपासून प्रचलित आहे, परंतु अलीकडे बदलत्या युगात घरात लोण्याचा वापर कमी झाला आहे. पाश्चराइज्ड पद्धतीने तयार केलेल्या लोण्यापेक्षा घरात बनलेले पांढरे लोणी अल्प प्रमाणात घेणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते , असे तज्ज्ञांचे मत आहे.

का ठरतो धोकादायक ?काही वर्षांपूर्वी संशोधक एंसल कीजने केलेल्या संशोधनात हे दिसून आले की, लोण्यात कोलेस्ट्रेरॉल आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने हृदयासंबंधित आजारांना आमंत्रण मिळते. त्यावेळ पासून विदेशात लोण्याचा वापर कमी झाला. हेच चलन भारतात आले. परिणामी हृदयविकारांच्या भीतीने लोकांनी लोणी खाणे पूर्णपणे बंद केले.


पांढरे लोणी उत्तम

यात मुबलक प्रमाणात शरीरात सहज मिसळले जाईल अशा स्वरूपात व्हिटॅमिन ए असते. जो थॉयराइडसाठी चांगले मानले जाते.

यात लेसिथिन असते, जो चयापचय प्रणालीला सक्षम करणारा कोलेस्ट्रेरॉल आहे.
व्हिटॅमिन्स ए शिवाय पांढरे लोणी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे. सोबतच यात असणारे अँटीऑक्सीडेंट्स आर्टरीजचे रक्षण करतात. दातांच्या मजबुतीसाठी हे फायदेशीर ठरते.


उत्कृष्ट

घरात तयार केलेल्या लोण्याला कच्चे लोणी देखील म्हटले जाते. हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. पाश्चराइज केल्याने लोण्यातील अनेक पोषक तत्त्वे नष्ट होतात. ताजे लोणी गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असते. लोणी बाळाच्या मेंदू, हाडे आणि दातांच्या निर्मितीत सहायक ठरते.


या गोष्टींकडे लक्ष द्या

घरात तयार केलेले लोणी दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळानंतर वापरू नये.

घरचे लोणी ताजे राहण्यासाठी ऑक्सीजनविरहित हवाबंद ठिकाणी ठेवावे.

लोणी तयार केल्यानंतरचे ताक देखील आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. यात मसाला टाकून घेतल्यास किंवा कढी केल्यास रुचकर लागते.

लोणी जास्त असल्यास त्याचे तुपात रूपांतर करून साठवून ठेवा.
थोडे नवीन जरा जुने