केसगळती ची कारणं कोणती? केसगळती कोणत्या आजाराने होते?
स्त्री आणि पुरुष यांच्या सौंदर्याचा केस हा मुकुट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र हे केस गळायला लागतात तेव्हा ही समस्येची बाब होते. त्यामागे आजार, औषधं किंवा अनुवंशिकता अशी विविध कारणं असतात. ही कारणं कोणती? तसंच ही केसगळती कोणत्या आजाराने होते व त्यावर कोणते उपाय करावेत याची माहिती घेऊया.
२८ वर्षाच्या अंकित जैनने नुकतीच नवीन नोकरी सुरू केली होती. त्याच्या डोक्यावर त्याला एक टक्कलाचा पॅच दिसला. ‘बहुतेक पुरुषांना असे टक्कल चालत असले तरी मला मात्र माझे तारुण्य जात चालले की काय, असं वाटत होतं. असं वाटणं हे कदाचित मेलोड्रामॅटिक किंवा उथळ वाटू शकेल, पण ही वस्तुस्थिती आहे’, असं निराश झालेला अंकित म्हणतो.

पुरुषाला टक्कल पडू लागते तेव्हा दोन गोष्टी कमी होतात, एक म्हणजे केस आणि दुसरा त्याचा आत्मविश्वास. पुरुषांसाठी दाट केस हे नेहमीच तारुण्याचे आणि पौरुषत्वाचे लक्षण असते. पुरुषासाठी टक्कल हे फसवे असू शकते.

एका पाहणीनुसार वयाच्या पस्तिशीपर्यंत दोन तृतीयांश पुरुषांचे केस कमी होऊ लागतात. याला अनुवांशिकता कारणीभूत असते. या लेखात पुरुषांना पडणारे टक्कल वा स्त्रियांना जास्त प्रमाणात होणारी केस गळती ही कोणत्या आजाराने होते व त्यावर कोणते उपाय करावेत याची माहिती दिली आहे.

केस गळण्याची कारणे

सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीचे दर दिवशी ५० ते १०० केस गळतात. याचे कारण म्हणजे केस सायकलनुसार वाढतात तर काही केस टेलोजेन अवस्थेत जातात. हे गळलेले केस साधारण १०० दिवसांनंतर पुन्हा उगवतात. पण व्यक्तीच्या डोक्यावर साधारण १,००,००० केस असतात. त्यामुळे या नगण्य केसगळतीमुळे डोक्यावरील केस कमी झाल्यासारखे वाटत नाहीत. जसजसे वय वाढत जाते, तसतसे व्यक्तीचे केस विरळ होत जातात. केसगळतीसाठीची इतर कारणे खालीलप्रमाणे –

हॉर्मोनल घटक

मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस हा अनुवंशिक घटक हे केसगळतीचे प्रमुख कारण असते. जनुकीयदृष्टय़ा ही अवस्था उद्भवण्याच्या शक्यता असलेल्या लोकांमध्ये सेक्स हॉर्मोनमुळे केस कायमचे गळू शकतात. हा घटक पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येत असून याची सुरुवात पौगंडावस्थेपासूनही होऊ शकते.

बहुधा आई किंवा वडिलांच्या बाजूकडून हा अनुवंशिक घटक कुटुंबात अस्तित्वात असतो. ज्या कुटुंबात दोन्ही बाजूकडून हा घटक अंतर्भूत असेल तिथे ही स्थिती अधिक गंभीर असते.

वजनात झालेली प्रचंड घट, गरोदरपणा, प्रसूती, गर्भरोधाच्या गोळ्या घेणे थांबवणे किंवा रजोनिवृत्तीमुळे हॉर्मोनमध्ये होणारे बदल वा असंतुलन यामुळे तात्पुरती केसगळती होऊ शकते.

आजार

अनेक प्रकारच्या आजारांमध्ये केसगळती होते. त्यात खालील आजारांचा समावेश आहे.

थायरॉइडची समस्या : तुमच्या शरीरातील हॉर्मोनच्या पातळीवर थायरॉइड ग्रंथी नियंत्रण ठेवते. ही ग्रंथी व्यवस्थित काम करत नसेल तर त्याची परिणती केसगळतीमध्ये होऊ शकते.

एलोपेशिया एरियाटा (चाई)- शरीरातील प्रतिकार यंत्रणा केसांच्या मुळावर आक्रमण करते तेव्हा हा विकार उद्भवतो. या विकारात केसांचे मऊ, गोलाकार पुंजके गळतात.

त्वचाविकार : लायकेन प्लॅनस किंवा ल्युपसच्या काही प्रकारांत पडणा-या भेगांमुळे कायमची केसगळती होते व भेगा पडतात.

औषधे

खालील विकारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणा-या औषधांमुळे केसगळती होऊ शकते.
» कर्करोग
» आर्थरायटिस
» नैराश्य
» हृदयविकार
» उच्च रक्तदाब

त्याचप्रमाणे खालील घटकांमुळेही केसगळती होऊ शकते :

शारीरिक किंवा मानसिक धक्का

शारीरिक किंवा मानसिक धक्का बसल्यानंतर काही वर्षानी केस विरळ झालेले जाणवू शकतात. वजनात अचानक झालेली घट, तीव्र ताप किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू.

केस ओढण्याचा विकार

या विकारात माणसांना आपले केस ओढण्याची आत्यंतिक इच्छा होते. हे केस त्यांच्या डोक्यावरील, भुवईचे किंवा कोणत्याही अवयवांवरील असू शकतात. डोक्यावरून केस ओढून काढल्यामुळे डोक्यावर टक्कल पडलेला भाग दिसू शकतो.

विशिष्ट प्रकारची हेअरस्टाईल

पिगटेल किंवा कॉर्न क्रो यासारख्या हेअरस्टाईलमध्ये केस अत्यंत घट्टपणे ओढले तर ट्रॅक्शन हेअर लॉस (केसगळती) होऊ शकतो.

उपचार

वैद्यकीय उपचार – अधिक केसगळती होऊ नये आणि सध्या असलेल्या केसांची काळजी घेण्यासाठी.

मिनॉक्सिडील सोल्युशन

मिनॉक्सिडील (२%, ५% किंवा १०% सोल्युशन) हे स्प्रे, जेल व लोशन असून टक्कल पडलेल्या भागावर दिवसातून दोन वेळा थेट स्कॅल्पवर लावायचे असते.
मिनॉक्सिडीलमुळे पुरुष आणि महिलांमधील केसगळती कमी होते, केसांची मुळे वाढतात आणि केस जाड होतात.

फिनास्टेराइड

» फेनास्टेराइड हे औषध ५-अल्फा रेड्युक्टेस टाईप-क हे एनझाईम स्त्रवण्याला प्रतिबंध करते. हे एन्झाईम टेस्टोस्टेरॉनपासून केसांच्या बीजामधील डिहायड्रोस्टेटे स्टोस्टेरॉनमध्ये (डीएचटी) परिवर्तीत करते. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेले केसगळतीसाठी हे एकमेव ओरल मेडिसीन (तोंडावाटे घ्यायचे औषध) आहे.

जीएफसीचा वापर करून पीआरपीची सुधारणा

» ज्या व्यक्तींना केसगळती किंवा केस विरळ होण्याच्या समस्येने ग्रासले आहे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पीआरपी थेरपी ही अत्यंत परिणामकारक ठरू शकते. या थेरपीमध्ये केस प्रत्यारोपण पद्धत वापरण्यात येते. ज्यात केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी वाढीस पोषक ठरणारे घटक हे केसगळतीच्या ठिकाणी इंजेक्ट करण्यात येतात.

लेझर कोम्ब्स

लेझर कोंब (फणी) हे लो लेव्हल वैद्यकीय उपकरण आहे. यात फोटोबायो स्टिम्युलेशनचा वापर करून केसगळतीवर उपचार करण्यात येतात.

सर्जिकल उपचार

» एफयूई – फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (एफयूई) या पद्धतीत फॉलिक्युलर युनिट हेअर ट्रान्स्प्लान्ट प्रोसिजरमध्ये दात्याचे केसांचे रोपण करण्यात येते. त्यासाठी एक छोटे उपकरण वापरण्यात येते. त्याने फॉलिक्युलर युनिटभोवती वतुर्ळाकार छेद करून त्याला आजूबाजूंच्या उतींपासून वेगळे करण्यात येते. त्यानंतर या केसांचे केसगळती झालेल्या ठिकाणी रोपण करण्यात येते.

» एफयूटी – एफयूटीचे तत्त्व अत्यंत सोपे आहे. स्कॅल्पच्या अत्यंत हेल्दी भागातून काढलेल्या त्वचेच्या पट्टीतून एक एक केस किंवा केसांचा पुंजका समाविष्ट असलेले मायक्रो ग्राफ्ट्स केसांचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी रोपण करण्यात येतात.
एफयूईटी – मेगा सेशन्स या केस प्रत्यारोपणाच्या मोठय़ा सत्रांसाठी या तंत्रांमध्ये दोन प्रक्रिया एकत्रितपणे केल्या जातात.

केस रिपोर्ट

» त्वचा आणि यकृत टेस्टोस्टेरॉनचे रूपांतर डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये या दुस-या हॉर्मोनमध्ये करतात. डायहायड्रोटे स्टोस्टेरॉनची पातळी वाढली तर त्याचा केसांचे बीजकोशांच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी ते आखूड होतात (टेलोजेन टप्पा) आणि स्कॅल्पला एक विरळ रूप येते.

» संपूर्ण स्कॅल्पवरील केस टाळू व कपाळाच्या बाजूच्या भागावर विरळ न होता, संपूर्ण डोक्यावरच विरळ होत असतील तर ही आरोग्याची समस्या असू शकते. थायरॉइड ग्रंथींसारख्या हॉर्मोनशी संबंधित समस्या किंवा आहारातील असमतोल यांचे हे लक्षण असते.

» यामुळे लोह किंवा प्रथिनांच्या पातळीची कमतरता निर्माण होते. त्यामुळे केसगळती सुरू होते. जेल, सेरम, कलरिंग एजंट आणि केस वाळवण्यासाठी नियमितपणे केला जाणारा ब्लो ड्रायरचा वापर यामुळे केसगळती होते.

» प्रसूती पश्चात येणा-या पॅटर्न बॉल्डनेसबद्दल सांगायचं झालं तर प्रसूतीदरम्यान, एस्ट्रोजेनची पातळी वाढल्यामुळे केसांच्या वाढीचा टप्पा लांबतो. खूप कमी केस रेस्टिंग स्टेजमध्ये असतात आणि दर दिवशी होणा-या केसगळतीमध्ये ही घट होते. त्यामुळे केसांची वेणी दाट आणि फुललेली असते.

» प्रसूतीनंतर महिलांच्या एस्ट्रोजेनच्या पातळीमध्ये झपाटय़ाने घट होते आणि रेस्टिंग स्टेजमध्ये खूप जास्त केसांचे बीजकोश प्रवेशतात. त्यामुळे आंघोळ करताना किंवा ब्रश करताना खूप जास्त केस गळून जातात.

» या विशिष्ट टप्प्यावर संपूर्ण डोक्यावरील केस विरळ होतात आणि टाळूवर हे प्रकर्षाने जाणवते. पॅटन्र्ड (विशिष्ट पॅटर्ननुसार) पडलेले टक्कल हे अनुवंशिक किंवा हॉर्मोनशी संबंधित घटकांवर अवलंबून असते.

» बहुतेक पुरुषांमध्ये कपाळाच्या बाजूचे केस त्यांच्या विशीच्या मध्यावर कमी झालेले दिसून येतात आणि चाळिशी, पन्नाशीच्या मध्यावर टक्कल प्रकर्षाने दिसून येते. महिलांमध्ये केसगळती ही सौम्य प्रमाणात असते.

» आयुष्याच्या उत्तरार्धात ती अधिक प्रमाणात होते. पण, केसगळती ही वेळेच्या आधीच तीव्र असेल तर त्यामुळे खूप नैराश्य येते. आजच्या घडीला वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या सुधारणांमुळे केसगळतीचा वेग कमी करण्यासाठी वा केसगळती कमी करण्यासाठी आणि थोडय़ा प्रमाणात वाढीला चालना देण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. अधिक टक्कल पडलेल्या व्यक्तींसाठी केस प्रत्यारोपणाचा पर्यायही उपलब्ध आहे.

» तुमच्याकडे दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे फॉलिक्युलर युनिट प्रत्यारोपण किंवा एफयूटी. सर्जन तुमच्या स्कॅल्पवरील एक पट्टी हार्वेस्ट करतात आणि तिला तीन किंवा चार केसांच्या गटांमध्ये कापतात. दुसरा पर्याय म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (एफयूई). यात डोक्याच्या मागील बाजूकडील केसाच्या प्रत्येक बीजकोशाचे हार्वेस्टिंग करण्यात येते.

» शस्त्रक्रियेनंतर स्कॅल्पवरील खपली काढण्याची इच्छा दाबून टाकण्याचा सल्ला देण्यात येतो. त्याचप्रमाणे दररोज डोक्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे. नैसर्गिकपणे या खपल्या आपोआप गळून पडतील. जिथून पट्टी काढली असेल तेथे मॉइष्टद्धr(155)रायझर लावावे आणि तीन-चार दिवस तीव्र स्वरूपाचा कार्डिओ व्यायाम करू नये आणि सकस आहार घ्यावा.

केसांची कोरडी त्वचा / ड्राय स्कॅल्प

» ड्राय स्कॅल्प ही परिस्थिती बहुधा हिवाळ्यात उद्भवते. पण ही परिस्थिती वर्षभरसुद्धा असू शकते. यात मोकळे, पांढ-या रंगाचे, पावडरसारखे कण असतात. चरबीसंबंधीच्या ग्रंथी (या ग्रंथी आपल्या स्कॅल्पसाठी नैसर्गिकरीत्या तेलाची निर्मिती करतात) डिहायड्रेट झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते.

» टोकाचे वातावरण, पुरेसे पाणी न पिणे किंवा सोरायसिस किंवा एक्झेमासारखे त्वचेचे विकार यामुळे डिहायड्रेशन होते. यामुळे केसांत कोंडा होण्याची शक्यता असते.

उपचार

» ड्राय स्कॅल्पवर उपचार करण्याची गुरुकिल्ली म्हणजे केसांना नैसर्गिक तेल लावणे. ऑलिव्ह आणि खोबरेल तेलात बुरशीविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. ही तेले स्कॅल्पमध्ये सहज शोषून घेतली जातात.

» अ‍ॅपल सायडर व्हिनेगार आणि पाणी समप्रमाणात एकत्र करा आणि हे द्रावण थेट तुमच्या स्कॅल्पवर लावा व थोडा वेळ मसाज करा. त्यानंतर शॅम्पू आणि पाण्याने केस धुवा.

कोंडा राहिला असेल तर त्यावर उपचार करा.

कोंडा

केसात कोंडा होणे ही अत्यंत सर्वसाधारणपणे आढळणारी समस्या आहे. यात सुकलेल्या त्वचेचे छोटे छोटे तुकडे निघून केसांमध्ये अथवा खांद्यावर दिसू लागतात. कोंडा झाल्यामुळे केसांमध्ये कंडसुद्धा येतो. स्काल्पवर सतत त्वचेच्या पेशींची निर्मिती होत असते, त्यामुळे मृत पेशी गळून पडणे ही अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे. असं असलं तरी कोंडा झाला असेल तर पेशींचे गळणे प्रमाणापेक्षा अधिक वेगाने होते.

स्कॅल्पमधील तेलामुळे त्वचेच्या पेशी गोळा होतात आणि पांढ-या रंगाच्या कणांमध्ये त्या दिसू लागतात. कोंडा होण्याची अनेक कारणे आहेत. कोरडी त्वचा, केसांच्या उत्पादनांविषयी संवेदनशील असणे; सोरायसिस, सेबोरिएक डमेर्टायटिस किंवा एक्झेमामुळेही कोंडा होऊ शकतो. यिस्टची प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली तरी केसांत कोंडा होऊ शकतो. तसेच या कोंडय़ामुळे केस गळतीही होते. त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

उपचार

» नॉन-मेडिकेटेड शॅम्पू हा पहिला उपाय आहे – त्याने स्कॅल्पला व्यवस्थित मसाज करून केस धुवावेत, त्यामुळे कोंडा निघून जातो, तेलकटपणा कमी होतो व मृत पेशी जमा होण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध होतो.

» नॉन-मेडिकेटेड श्ॉम्पूंचा उपयोग होत नाही, तेव्हा अँटी-डँडरफ श्ॉम्पू परिणामकारक ठरतात. कोंडा होण्यामागचे नक्की कारण समजणे हे अत्यंत आवश्यक असते.

» मलासेझिया नावाच्या यिस्टमुळे उद्भवणारा कोंडा घालवण्यासाठी केटोकोनेझोल असलेला शॅम्पू अधिक परिणामकारक असतो.

» सोरायसिसमुळे झालेला कोंडा घालवण्यासाठी सॅलिसायक्लिक अ‍ॅसिड वापरून केलेली उत्पादने वापरण्यात येतात.

» सेबोरिएक डर्मेटायटिसमुळे झालेला कोंडा घालवण्यासाठी सल्फर आणि कोल टारपासून केलेली उत्पादने वापरण्यात येतात.

दुभंगलेली टोके (स्प्लिट एंड्स)

» स्प्लिट एंड्स म्हणजे विविध कारणांमुळे केस दुभंगणे.

» केसांची निगा न राखल्याने केस तुटून स्प्लिट एंड्स तयार होऊ शकतात. उदा. केस व्यवस्थित न विंचरल्यामुळे, केस ओले असताना ब्रश केल्याने वा प्रमाणापेक्षा अधिक ब्लो ड्रायिंग केल्यामुळे स्प्लिट एंड्स तयार होऊ शकतात. उन्हाळ्यातील उन्हामुळे केस कोरडे झाल्यामुळे केस तुटणे हे वातावरणीय घटकही कारणीभूत असतात.

» तुमच्या केसांची बळकटी आणि स्प्लिट एंड्स उद्भवण्याची शक्यता यांचा तुमचा आहार, हॉर्मोन्स आणि जीवनसत्वे किंवा क्षार यांच्याशी थेट संबंध असतो. प्रामुख्याने थायरॉइडची कमतरता हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

» गरम स्टायलिंग उपकरणांचा अति वापर (आयर्न, हॉट कर्लर्स, ब्लो ड्रायर्स, हॉट कोम्ब्स) रासायनिक प्रक्रियांचा ओव्हरडोस (रिलॅक्सर्स, पर्म्स, हेअर कलर) केल्यामुळेही स्प्लिट एंड्स होऊ शकतात.

उपचार

» गुंतलेले केस किंवा स्प्लिट एंड्ससाठी कारणीभूत असणारं सामान्य कारण म्हणजे थायरॉइडची कमतरता. त्यावर आणि हॉर्मोन्सच्या असंतुलनावर उपचार करा.

» केस वाळवण्यासाठी किंवा कुरळे करण्यासाठी हॉट आयर्न नियमितपणे वापरू नका

» तुमचे केस रंगवण्यासाठी, पमिर्ंगसाठी किंवा रिलॅक्सिंगसाठी रसायने वापरणे थांबवा. कारण त्यामुळे तुमच्या केसांमधील एकसंघता लोप पावते.

» तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी तुमचे केसांचे नियमितपणे सखोल कंडिशनिंग करा.

» केवळ तुमचे केस वाळलेले असतील तेव्हाच जाडे दाते असलेल्या कंगव्याने तुमचे केस विंचरा.

» तुम्ही शॅम्पू करता, तेव्हा तुमच्या केसांना डोक्यावर साठवू नका. असे केल्यास स्प्लिट होण्याची खूप शक्यता असते. शॅम्पू हा केवळ केसांच्या मुळांना लावण्याची आवश्यकता असते.

» स्प्लिटच्या वरच्या पातळीवर तुमचे केस ट्रीम करा, जेणेकरून स्प्लिट वाढणार नाही.

» हेअर कलरचे साइड इफेक्ट्स

» हेअर डायमधील कोणत्या रसायनांमुळे केसांवर परिणाम होतो, काय परिणाम होतो, त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि उपचार?

» त्वचा आणि केसांची मुळे ही जिवंत उती असतात. त्यामुळे केसांवर जे काही लावले जाते, ते थेट त्वचा आणि उतींद्वारे शोषून घेतले जाते. परिणामी कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या उत्पादनांमधील रसायने थेट शोषून घेतली जातात.

» याचाच अर्थ हा की, पारंपरिक सौंदर्य उत्पादनांमधील प्थॅलेट्स पॅराबेन्स, पेट्रोलिअम वॅक्सेस, इत्यादी रसायने थेट तुमच्या शरीरात जातात. याहून वाईट बाब ही की, या सौंदर्य उत्पादनांमधील अनेक रसायनांच्या कधीच चाचण्या झालेल्या नसतात, त्यामुळे या रसायनांमुळे भविष्यात आरोग्याला निर्माण होणा-या समस्यांबाबत आपण अनभिज्ञ असतो.

» नैसर्गिक सेंद्रिय उत्पादनांमध्ये अतिरिक्त रसायने नसल्यामुळे अशा समस्या उद्भवत नाहीत. लोकांकडून वापरण्यात येणा-या हेअर डायमुळे केसगळती होते आणि अनेकांच्या स्कॅल्पची जळजळ होते. मेंदीसारख्या नैसर्गिक डायमुळे यापासून प्रतिबंध होतो.
थोडे नवीन जरा जुने