रोज मधात भिजलेले बदाम खाल्याने होतील हे फायदे !


मध आणि बदाम हे दोन्ही पदार्थ अत्यंत लाभदायी औषधी आहेत. यांमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. अँटीऑक्सीडंट, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. 

आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता.


- यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही निरोगी राहील.

- मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते.

- एजिंगला थांबवते व त्वचा निरोगी ठेवते.

- यातील अँटीअ‍ॅलर्जिक आणि अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार दूर राहतात.

- प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्यामुळे स्नायू मजबूत आणि सशक्त बनतात. यामुळे अशक्तपणा दूर होतो.

- केसांना मजबूत ठेवण्यासोबतच डोळ्याची शक्तीही वाढवतात.
थोडे नवीन जरा जुने