मानदुखीने त्रस्त असल तर ह्या टिप्स फॉलो करा...होईल फायदा !


तासनतास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करणं ही अनेकांची मजबूरी झाली आहे. परिणामी मानदुखी मागे लागते. कशी मिळवाल यापासून मुक्ती?

दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास घेत असताना आपल्या खांद्यांना उचला आणि त्यांना कानांपर्यंत घेऊन जा. मग श्वास सोडताना त्यांना परत आपल्या जागी घ्या. 

खांद्यांच्या पेशींवर आलेला तणाव दूर करण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो. व्यायामाची ही प्रक्रिया सहा वेळा करा. खुर्चीवर ताठ बसा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, श्वास घेत असताना शरीराच्या वरच्या भागाला तोपर्यंत मुडपा, जोपर्यंत डाव्या हाताने तुम्ही खुर्चीच्या मागच्या भागाला पकडत नाही. 

श्वास सोडत असताना हीच प्रक्रिया उजव्या बाजूने करा. तीन - तीन वेळा दोन्ही बाजूनी व्यायाम करा. यामुळे कंबरेच्या वरच्या भागातील पेशींना आराम मिळेल. खुर्चीवर ताठ बसा आणि हातांना खालच्या दिशेने करत खुर्चीवर ठेवा. 

आता तुमच्या डोक्याला डाव्या बाजूला तोपर्यंत घेऊन जा, जोपर्यंत डाव्या खांद्याला स्पर्श करत नाही. पाच सेकंदानंतर सामान्य स्थितीत या. उजव्या बाजूनेही हा व्यायाम करा. या व्यायामामुळे खांदे आणि मानेच्या वेदनांपासून आराम मिळतो.
थोडे नवीन जरा जुने