नाजूक डोळे सुकून जाऊ नयेत यासाठी या टिप्स..


उन्हाळ्यातील उष्णता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे डोळ्यांवर परिणाम करते. यामुळे डोळ्यांचे नुकसान होतं. जे अनेकदा गंभीर आजारांना कारणीभूत ठरतं.

ड्रायनेसची समस्या - उन्हाळ्यात वातावरणात खूप जास्त उष्णता आणि शुष्कता असते. यामुळे डोळ्याच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये मुख्य समस्या म्हणजे डायनेस, ड्रायनेसच्या स्थितीत डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे डोळे खाजणे, वेदना होणे यांसारखी लक्षणं दिसतात.

कारणं लक्षात घ्या - डोळ्यांच्या रूक्षतेसाठी सगळ्यात जास्त जबाबदार ठरते ती गरम हवा. केवळ बाहेर पडल्यानंतरच ड्रायनेसची समस्या जाणवते असं नाही तर घरात, ऑफिसमध्येही ही समस्या होऊ शकते.

डॉक्टरांच्या मते, या ड्रायनेसचे मुख्य कारण कूलर, एसी हे आह .

सावधगिरी महत्त्वाची - उन्हाळ्यात काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून डोळ्या संबंधित आजार आणि समस्यांपासून दूर राहाता येतं.

साधारणतः ११ ते ३ या दरम्यान घराच्या बाहेर पडू नका. जर या दरम्यान घराच्या बाहेर पडणारच असाल तर हेल्मेट, डार्क गॉगल, टोपी आणि छत्री यांचा वापर करा.

डोळ्यांवर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्या त्यासाठी डोळ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या.

बाहेरून आल्यानंतर डोळे स्वच्छ करा आणि थंड पाण्याने डोळे व्यवस्थित धुवा.
थोडे नवीन जरा जुने