हृदयाला निरोगी ठेवायचे असेल तर, करा 'हे' उपाय !हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवत हृदयाला निरोगी ठेवता येते.धकाधकीच्या आयुष्यात हृदयाला खूप तणावाचा सामना करावा लागतो. अशा वेळी हृदयाच्या आरोग्याकडे करण्यात आलेले थोडेसे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते. 


आपल्या आहारात केलेल्या बदलांमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारांपासून बचाव केला जाऊ शकतो.

पुरेशी झोप घ्या


भरपूर झोप घेतल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येतूनही सुटका होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी या दोन्हीही गोष्टी फायदेशीर आहेत. एका सामान्य व्यक्तीने दिवसभरातून कमीत कमी सात ते नऊ तासांची झोप घेतली पाहिजे.


मिठाचा वापर कमी करा

मिठाचे जास्त सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. शरीरात मिठाचे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. हृदयाला या धोक्यापासून वाचवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.


सप्लिमेंट्सची मदत

जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे सप्लिमेंट्स घेणे हृदयविकारांपासून बचाव करण्याची सोपी पद्धत आहे. कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठीही बाजारात भरपूर औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच या औषधांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.


तणाव कमी करा

तणावामुळे हृदयविकारांचा धोका अप्रत्यक्षरीत्या वाढतो. तणाव वाढल्याने रक्तदाब वाढतो आणि यामुळे हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा अचानकपणे वाढतो. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. योगासने आणि आध्यात्माच्या मदतीने शारीरिक आणि मानसिकरीत्या निरोगी राहता येते.


कोणतेही व्यसन करू नका

कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचा थेट हृदयावर परिणाम होतो. अल्कोहोलमुळे झोपमोड होते, तणाव आणि तणावामुळे रक्तदाब वाढतो. ही संपूर्ण प्रक्रिया हृदयासाठी अत्यंत घातक ठरते. जवळपास असेच धोके सिगारेट पिल्याने आणि तंबाखू खाल्ल्याने होतात.
थोडे नवीन जरा जुने