हे घरगुती उपाय करून मिळवा तापापासून मुक्ती....


१) तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
२) तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो.
३) पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
४) आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
५) थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
६) जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
७) कांद्याचा रस घेतल्याने जुनाट ताप देखील कमी होतो.
८) तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.
९) तापात मनुके खाणं उपयुक्त ठरतं. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे दिवसांतून दोन वेळा घ्यावं.
१०) तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही आराम मिळतो.
थोडे नवीन जरा जुने