कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना


बारामती: अजित पवारांनी गंमतीने आपण चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिलेले आहे, असे सांगत असतानाच `कसं का असेना` असे म्हणत काही क्षण काही क्षण मागील नाट्यमय घडामोडींचा उलगडा केला. 

बारामतीतील बाजार समीतीच्या रयत भवनमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूकीसंदर्भात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना, माझ्या पध्दतीने झालो असेल. पण गंमतीचा भाग जाऊ द्या, म्हटलं, साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते, चला आपण पण चार वेळा उपमुख्यमंत्री झालो.
असे म्हणून अजित पवारांनी काही वेळ पॉझ घेतला आणि बारामतीकरांमध्ये हास्याचा स्फोट झाला.
थोडे नवीन जरा जुने