अननसाचा रस 'ह्या' गोष्टींवर आहे फायदेशीर !


योग्य आहार आणि औषधांमुळे तुम्ही शरीरात तयार होणाऱ्या युरिक अ‍ॅसिडच्या स्तराला नियंत्रित करू शकता. युरिक अ‍ॅसिडची अधिकता शरीराला बऱ्याच प्रकारे नुकसान पोहोचवते. 

आम्ही तुम्हाला अशा काही नॅचरल ड्रिंक्सबद्दल सांगत आहोत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी होईल आणि तुम्हाला त्याचा योग्य फायदादेखील मिळेल. 

नारळपाणी 
युरिक अ‍ॅसिडच्या स्तराला नियंत्रित करण्याचा सर्वात उत्तम उपाय पाणी आहे. पाण्याशिवाय नारळपाणीदेखील युरिक अ‍ॅसिडला नियंत्रित करते. हे युरिक अ‍ॅसिडला पातळ करून किडनीला उत्तेजित करतात ज्यामुळे शरीरातून युरिक अ‍ॅसिडड मूत्राच्या माध्यमाने बाहेर निघून जाते. 

मोसंबी आणि पुदिना 
या ड्रिंकमध्ये पर्याप्त मात्रेत व्हिटॅमिन असतात, जे युरिक अ‍ॅसिडच्या स्तराला कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन करण्यासाठी मोसंबीचे साल काढून त्याच्या बारीक बारीक फोडी करून त्यात लिंबाचा रस आणि पुदिन्याचे पान घालावे व या मिश्रणाला मिक्सीतून फिरवून त्याच्या ज्यूस काढावा व त्याचे सेवन करावे. 

सेबचा सिरका 
सेबचा सिरका शरीरातून युरिक अ‍ॅसिडदूर करण्यास मदत करतो. अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमंेटरी गुणांमुळे हे शरीरात क्षारीय अ‍ॅसिडचे संतुलन बनवून ठेवते. हा सिरका रक्ताच्या पीएच व्हॉल्यूमला वाढवून युरिक अ‍ॅसिडला कमी करण्यास मदत करतो. 

अननसाचा ज्यूस 
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सीसोबत इतर अँटिऑक्सिडंट असतात जे युरिक अ‍ॅसिडच्या स्तराला कमी करून शरीरातून बाहेर काढण्यात मदत करतात. याचे सेवन केल्याने शरीराला दुसरे इतर फायदेदेखील मिळतात. 

ब्लॅक चेरी आणि चेरी 
ब्लॅक चेरी आणि चेरीचा ज्यूस युरिक अ‍ॅसिडमुळे होणारे संधिवात किंवा किडनी स्टोनच्या समस्येसाठी योग्य आहे. ब्लॅक चेरी युरिक अ‍ॅसिडच्या सिरम स्तराला कमी करून संधिवात आणि किडनीहून क्रिस्टल दूर करण्यास मदत करते. यात अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमेंटरी गुणदेखील असतात, जे युरिक अ‍ॅसिडकमी करण्यास मदत करतात. 

खिऱ्याचे सूप 
खिऱ्याचे सूप शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबत युरिक अ‍ॅसिडच्या स्तराला कमी करते. याचे सेवन करण्यासाठी एका भांड्यात खिऱ्य‍ाचा ज्यूस, पाव कप योगर्ट, पुदिन्याचे पान आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि थोड्या वेळाने गार झाल्यावर त्याचे सेवन करा.
थोडे नवीन जरा जुने