यंदाही शौर्य दिनात दंगल घडवण्याचा डाव होता, पण....


कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तभांला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं आहे. 

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की, दंगल घडवण्याचा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळला. दरम्यान सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनानं कडेकोट नियोजन केलं आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली आहे. तसंच 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आंबेडकरांनी विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना दावा केला की, मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्यानं लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात सत्तांतर झालं आहे. त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. हा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळून लावला.

पुढे ते म्हणाले की, सत्ता बदलल्यानं त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोकांकडून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. हा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळून लावला. तर उपमुख्यमंत्र्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा. 

जातीय सलोखा ठेवण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नववर्षात सरकार महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल, असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं.
थोडे नवीन जरा जुने