वैवाहिक जीवन आनंदाने जगायचंय? मग पत्नीची अशी घ्या काळजी
एका मुलाचे अत्यंत सुंदर मुलीशी लग्न झाले. दोघांचेही एकमेकांवर खुप प्रेम होते. मुलगा नेहमी आपल्या पत्नीच्या सौंदर्याचे कौतुक करायचा. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुलीला त्वचारोग झाला. यामुळे हळू-हळू तिचे सौंदर्य कमी होऊ लागले.


पत्नीला वाटले, आपले सौंदर्य कमी झाल्यानंतर पती पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रेम करणार नाही आणि हे मला सहन होणार नाही. पतीलाही पत्नीच्या मनातील ही भीती लक्षात आली होती. एके दिवशी पती ऑफिसमधून घरी येत असताना रस्त्यामध्ये त्याचा अपघात झाला.

अंध पतीला याविषयी काहीही माहिती नव्हते यामुळे त्यांचे जीवन आनंदात चालू होते. तो आपल्या पत्नीवर पुर्वीप्रमाणचे प्रेम करत होता. काही काळाने पत्नीचे निधन झाले आणि पती एकटा पडला. तो खूप उदास राहू लागला आणि यामुळे त्याने शहर सोडण्याचा निश्चय केला. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला विचारले, आता तू एकटाच कोणाच्याही आधाराशिवाय कसे काय जगणार? एवढे वर्ष तुझी पत्नी मदत करत होती. आता तर तीसुद्धा देवाघरी गेली.

तो व्यक्ती मित्राला म्हणाला - मी आंधळा नाही. मी फक्त अंध असल्याचे नाटक करत होतो कारण माझ्या पत्नीला मी तिचा विद्रुप चेहरा पाहू शकतो हे समजले असते तर तिला खूप त्रास झाला असता. मला फक्त माझ्या पत्नीला आनंदी पाहायचे होते.

लाईफ मॅनेजमेंट

पती-पत्नी तेव्हाच आनंदी राहू शकतात जेव्हा, ते एकमेकांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करतील. दोघेही एकमेकांच्या चुका शोधत राहिले तर जीवनातील अडचणी आणि कलह वाढत जातील आणि आनंद कधीही मिळणार नाही.
थोडे नवीन जरा जुने