अबब !! ‘मेथी’ खाण्याचे एवढे फायदे ?मेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी.

सर्व पालेभाज्यांमध्ये मेथी अव्वल आहे. मेथीची पाने जशी गुणकारी आहेत तसे मेथीचे दाणेही तितकेच औषधी आहेत. मेथीचा वापर भाजी करण्यासाठी कराच, पण सोबत लाडू, पराठे यातही मेथीचा अंश असूद्यात. चटणी, लोणच्यांमध्ये तर मेथीच्या बियांचा, कसुरी मेथीचा वापर सर्रास केला जातो.

चव वाढवण्यासाठी या बिया उपयोगी आहेतच, पण शरीराला फायदेशीरसुद्धा आहेत. मधुमेह असणा-यांना मेथीचा होणारा उपयोग हा सर्वश्रृत आहे. अशा या औषधी मेथीचे आणखी कोणते गुणधर्म आहेत हे जाणून घेऊयात.

» मेथीची पानं ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवावीत. ते पाणी दिवसा प्यावे. नियमितपणे असे केल्यास मधुमेहाने त्रस्त रुग्णांना फायदा होऊ शकतो.

» मेथीचा लाडू, भाजी, मेथीचा पराठा असे वेगवेगळे पदार्थ करत आहारात मेथीचा समावेश वाढवावा.

» मेथीचा लाडू दिवसातून एक तरी खावा. तो अंगदुखीवर गुणकारी आहे.

» रक्तशुद्धीसाठी मेथी उपायकारक आहे.

» कॉलेस्ट्रॉल कमी करते.

» मेथीच्या दाण्यांचा वापर मसाल्यांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो.

» मेथीची पाने सुकवून त्याची कसुरी मेथी करून मसाल्यात, लोणच्यात वापर केला जातो.

» मातांना दूध चांगले येण्यासाठी मेथीची भाजी चांगली असते. त्यामुळे मातांच्या आहारात मेथीचा समावेश असलेल्या पदार्थाचा समावेश करावा.

» सुजलेले स्नायू, पोटदुखी, गॅस यांच्यावरील उपायांसाठी मेथीचा वापर केला जातो.

» उत्तम प्रथिनयुक्त आणि यकृतसंरक्षक म्हणून कार्य करते.

» तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो.

» क्षार आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण.

» मेथी पचनाला उत्तम असल्याने आहारात तिचे प्रमाण वाढवावे.

» मधुमेहासह उच्च रक्तदाबाला प्रतिबंध करते.
थोडे नवीन जरा जुने