मोबाईल हैंग होण्याच्या त्रासा पासून सुटका हवी आहे ? हे करा

गूगल प्ले स्टोर मध्ये दररोज नवीन एप्लिकेशन येत असतात त्यामधले काही गरजेचे असतात तर काही निव्वळ जागा खाणारे असतात. तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा मोबाईल असला तरी तो हैंग होणे सामान्य झाले आहे. 


तुम्ही मोबाईल हैंग होण्याची तक्रार अनेक लोकांच्या कडून ऐकली असेल किंवा स्वता त्यास सामोरे गेले असाल त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचा मोबाईल हैंग होण्याची समस्या संपून जाईल.

हैंग होण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल मधून काही एप्लिकेशन डिलीट करावे लागतील. हे एप्स असे असतात ज्यामुळे फोन देखील खराब होऊ शकतो. एंड्राइड फोन जेव्हा हैंग होतात तेव्हा लोक एकतर मोबाईलची बैटरी काढतात किंवा री-स्टार्ट करतात. आज आपण यावर कायमस्वरूपी उपाय पाहणार आहोत.

जर तुमच्या मोबाईल मध्ये जर इंटरनल मेमोरी कमी असेल तर जास्तीत जास्त एप्स मेमोरी कार्डवर स्टोर करा. तुम्हाला भरपूर एप्स वापरण्याची आवड असेल तर तुमचे जास्तीत जास्त एप्स मेमोरी कार्डवर मूव करा. फोन हैंग होण्याचे मुख्य कारण फोन मैमोरी असते.
तुमचा मोबाईल आता हैंग होणार नाही निदान फोन मैमोरीच्या प्रोब्लेम मुळे तरी नक्कीच नाही.
थोडे नवीन जरा जुने