चेहरा आणि केसांच्या समस्येवर ग्रीन टी आहे उपयुक्त !


मेडिकल ऑफ जॉर्जियाच्या संशोधनानुसार ग्रीन टीमध्ये असे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ग्रीन टी चेहरा किंवा केसांवर लावल्यास अनेक समस्या दूर होतात. ग्रीन टी उकळून त्याच्या टी बॅग्जचा वापर करता येतो.


मेडिकल ऑफ जॉर्जियाच्या संशोधनानुसार ग्रीन टीमध्ये असे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ग्रीन टी चेहरा किंवा केसांवर लावल्यास अनेक समस्या दूर होतात. ग्रीन टी उकळून त्याच्या टी बॅग्जचा वापर करता येतो.

उकळलेल्या ग्रीन टीच्या पानांमध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्याचा रंग उजळतो. तसेच चेहऱ्यावरील डागही दूर होण्याच मदत होते.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या ग्रीन टी बॅग्ज पंधरा मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काढून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील डार्क सर्कल दूर करण्यास मदत मिळते.

ग्रीन टीची पाने बारीक करून त्यामध्ये दही, हळद पावडर मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि धुऊन घ्या. रिंकल्स दूर होतील.

ग्रीन टी पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी गार करून कापसाने चेहऱ्यावर लावा. हे पाणी पिंपल्स दूर करण्यात मदत करतात.

ग्रीन टी पाण्यासोबत उकळून गार करा. यामध्ये बदाम तेल मिसळून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचे सौंदर्य वाढेल.

ग्रीन टी पाण्यासोबत उकळून गार करा. शाम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुऊन घ्या. यामुळे केस गळती दूर होते आणि केसांची चमक वाढते.

ग्रीन टी पाणी टाकून उकळा. हे फ्रिजमध्ये ठेवून गार करा. आता त्वचेवर हे लावा. यामुळे सन टॅनिंग दूर होईल.

ग्रीन टीच्या पानांमध्ये बेकिंग सोडा आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे स्किन टाइट होते आणि चेहऱ्याची चमकही वाढते.

ग्रीन टीची पाने बारीक करून त्यामध्ये दही आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांवर लावल्याने कोंडा दूर होतो.

तांदळाच्या पिठामध्ये ग्रीन टीची पाने बारीक करून मिसळा. हे त्वचेवर लावा आणि सुकल्यानंतर धुऊन घ्या. यामुळे डेड स्किन दूर होते.
थोडे नवीन जरा जुने