'ह्या' गोष्टींची काळजी घ्या, शरीर राहील नेहमी निरोगी !


जास्त शिजवलेले, तळलेले, मसालेदार, तिखट, आंबट, चरमरीत पदार्थ वीर्यनाड्यांना क्षुब्ध करतात. गरम-गरम पदार्थ खाऊन लगेच थंड पेय प्यायल्याने अथवा थंड पाणी पिऊन लगेच गरम गरम चहा प्यायल्याने दात कमजोर होतात. 

रिकाम्यापोटी चहा-कॉफी पितात, त्यांचे वीर्य पातळ होते आणि वीर्यनाश होऊ शकतो. अन्न खूप चावून-चावून खावे. थकून आल्यावर लगेच जेवण करू नये.

जेवणानंतर लगेच परिश्रम करू नयेत. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये. जेवण करताना आणि नंतर तासाभराने पाणी पिणे हितकर असते.रात्री अल्पाहारच घ्यावा. रात्री उशिरा जेवण करणे शरीरासाठी हितकर नाही.

रात्री उशिरा खाल्याने स्थूलता, आळस, व थकवा येतो आणि अशा व्यक्तींना वार्धक्यसुद्धा लवकर येते. जितकी रात्रीची वेळ अधिक तितका जठराग्नी मंद. आहारात पालक, पडवळ, मेथी, घोळ इ. हिरव्या भाज्या; दुध, तूप, ताक, लोणी, पिकलेली फळे इ.चा अधिक वापर करावा. 

यामुळे जीवनात सात्विकता वाढेल आणि काम, क्रोध, मोह हे विकार कमी होतील. प्रत्येक कार्यात प्रसन्नता व उत्साह टिकून राहील.
थोडे नवीन जरा जुने