यशस्वी होण्यासाठी 'हे' गुणधर्म तुमच्यात असायलाच हवे !


यशस्वी माणसांना भय जाणवत नाही असे नाही, पण ते अशा प्रसंगांनी खचत नाहीत. ते अशा गोष्टींचा सामना करतात व सतत कार्य करून ध्येय पूर्ण करतात. अनुभवातून ते शिकतात. 

उद्दिष्टांची सुस्पष्ट कल्पना असते. यशस्वी व्यक्तींचे हेच वैशिष्ट्य असते की, त्यांना काय हवे आहे? हे अचूक माहीत असते. आपल्या उद्दिष्टांची त्यांना सुस्पष्ट कल्पना असते. 


यशप्राप्तीकरिता पात्र असल्याचा आत्मविश्वास. जीवनाकडून तुमच्या इच्छापूर्तीच्या गोष्टी प्राप्त होण्याकरिता तुमचा स्वत :चा आत्मविश्वास असला पाहिजे, की या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात. इच्छा पूर्ण होईल असा विश्वास असतो. 

आपल्याला जे हवे त्याची मागणी करताना, सर्व अग्रगण्य व यशस्वी व्यक्तींना आपण जे मागतोय ते आपल्याला नक्की मिळेल, असा विश्वास असतो. ध्येयाबाबत ते अपार उत्साही असतात. मागितले तर मिळतेच' असा विश्वास ठेवून ते लोक ध्येयाबाबत खूप उत्साही असतात. 

भयाचा मुकाबला करण्यासाठी ते कृती करतात. यशस्वी माणसांना भय जाणवत नाही असे नाही, पण ते अशा प्रसंगांनी खचत नाहीत. ते अशा गोष्टींचा सामना करतात व सतत कार्य करून ध्येय पूर्ण करतात.

अनुभवातून ते शिकतात. आपल्याला जे हवे ते एकाच प्रयत्नाने मिळत नाही , हे ते जाणून असतात . त्यामुळे ते काही प्रयत्न वाया गेले तरी प्रयत्न करणे सोडून देत नाहीत. 

 ते चिकाटीने काम करतात . त्यांना विश्वास असतो की, जी गोष्ट आपण ठरवली त्याचा चिकाटीने पाठपुरावा केला,  तर ती साकार करू शकतोच.
थोडे नवीन जरा जुने