हे तुम्हाला माहित आहे का ? पाणी पिऊन वजन नियंत्रणात ठेवता येते


पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीरातील ७० टक्के भाग हा जलीय आहे. ज्याप्रकारे आपल्याला अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रकारे पाणी देखील आपल्या शरीराच्या दैनंदिन प्रक्रियेसाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला भूख लागते तेव्हा आपण कसं पटकन खातो त्याचप्रमाणे तहान लागल्यावरही आपण लगेचच एक ग्लास पाणी पितो आणि तहान भागवतो.

 पाणी आपल्या शरीरासाठी पचनक्रियेपासून उर्त्सजन क्रियेपर्यंत सर्व काम करतं. ज्ज्ञांच्या मते, १० ते १४ ग्लास पाणी दररोज पिणं गरजेचं आहे. बऱ्याच सर्व्हेमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, पाणी पिऊन वजन नियंत्रणात ठेवता येते आणि त्यासोबतच फॅट बर्न देखील केलं जाऊ शकतं.

पाणी प्यायचे महत्त्वाचे लाभ जाणून घ्या 

पाणी आपल्या शरीराचे तापमान स्थिर ठेवते.पाणी प्यायल्याने आपली त्वचा ही चांगली राहते. पाणीमुळे आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.पिण्याचे पाणी आपल्याला विविध मार्गांनी आरोग्य लाभ प्रदान करते.

पाणी पिणं हे कार्य वजन कमी करण्यासाठी सर्वांत सोपा उपाय मानला जातो. जर का आपण की पाणी पितं असू तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. या विषारी पदार्थांमुळे तब्येतीवरच परिणाम होत नाही तर शरीरात अतिरिक्त फॅट जमा होण्यास सुरूवात होते. त्यामुळे शरीरात सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत पुरेसे पाणी असणं आवश्यक आहे.

आवश्यकतेनुसार पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिज्म भी चांगलं राहते त्यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित राहते. तसेच यामुळे तुमच्या शरीरात फॅट जमा होत नाही. जर का तुम्ही पाणी पिऊन वजन कमी करायचं ठरवलं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. कमी पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया खराब होते आणि तब्येतीवर त्याचा परिणाम जाणवू लागतो.

पाणी आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी खूपच गरजेचं आहे. पाणी दोन प्रकारचे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. एक शरीरातील बर्न झालेली ऊर्जा आणि कॅलेरीजचं प्रमाण वाढवतं. सतत पाणी प्यायल्याने जर का तुम्हांला सारखं खाण्याची सवय असेल तर तुमची आपोआप ती सवय दूर होते. पाणी कमी प्यायल्याने फॅट बर्न करण्याची क्षमता देखील कमी होऊन जाते.

पाण्याचे दोन प्रभावी उपयोग जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही गरम पाणी प्यावं. कमीत कमी ४ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि त्यामुळे अतिरिक्त चरबी जमा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर लगेचच तात्काळ पाणी बिल्कुल पिऊ नये.

यामुळे पचनक्रिया खराब होते आणि स्थूलपणा येतो. कमीत कमी खाणं आणि पाणी पिणं यामध्ये जवळपास ४० ते ४५ मिनिटांचं अंतर असावं. हीच गोष्ट आयुर्वेद म्हणतं की, जेवल्यानंतर पचनक्रियेसोबत आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवतात आणि त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणं टाळावं.
थोडे नवीन जरा जुने