एखादे काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी 'ह्या' टिप्स फॉलो करा !

आपल्याला प्रत्येक काम चांगलेच हवे असते. तुम्हाला जादा प्रेरणादायक लीडर बनायचे असेल, जादा काम करायचे असेल किंवा जादा जोखीम घ्यायची असेल तर स्वत:ला असा प्रश्न करा की, तुम्हाला खरेच काम चांगले करायचे आहे का? की, बॉसची इच्छा म्हणून ते करत आहात. 


बदल तेव्हाच घडतो जेव्हा तुम्ही अगदी जिद्दीला पेटता. जेथे तातडीने फायदा होत नाही तेथे त्रास सहन करायची तुमची तयारी आहे का? नवे शिकणे म्हणजे गैरसोय सहन करणे.

तुम्हाला कदाचित अडाण्यासारखे वाटू शकते किंवा लाजही वाटेल. तुम्ही जर सतत जिंकणारे असाल तर हे जास्तच जाणवेल.

यांचा तुम्ही स्वत:वर परिणाम होऊ देत नसाल तर निश्चितच चांगल्याकडे तुमची वाटचाल चालू आहे, असे समजा.
थोडे नवीन जरा जुने