आरोग्यासंदर्भाचे 'हे' जुने सल्ले,तुम्हाला माहित आहे का?आपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुम्हालाही सुदृढ आरोग्य हवे असेल तर हे जुने फंडे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरा. हे जुने फंडे आरोग्य फिट ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

आपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुम्हालाही सुदृढ आरोग्य हवे असेल तर हे जुने फंडे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरा. हे जुने फंडे आरोग्य फिट ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

आज आम्ही तुम्हाला फिट राहण्याचे काही जुने मात्र दमदार फंडे सांगत आहोत.

अति जेवण करणे हे आरोग्यासाठी हितकारक नाहीये. कमी खाणारे व्यक्ती नेहमी निरोगी आणि सुखी असतात. जी व्यक्ती खूप भूक लागल्यावर प्रमाणात जेवण करते ती नेहमी निरोगी राहते. त्यामुळे पोटाला लागेल जेवढेच खा.


काळे मिरे वाटून त्याचे चुर्ण बनवा. हे चुर्ण ३ ग्रॅम तुप आणि साखरेत रोज सेवन करा. त्यामुळे डोळे निरोगी राहतता. डोळ्याचे आजार उद्भवणार नाहीत. डोळे लाल होत असतील तर हा उपाय नक्की करा. डोळ्याचे आजार दूर करण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.


दररोज जेवन झाल्यानंतर १० ग्रॅम गुळाचे सेवन करा. पोटाचे आजार उदा. अपचन, गॅसेस, पोटदुखी या त्रासापासून सुटका होईल. दररोज १० ग्रॅम गुळ खाण्याची सवय लावा. गुळाच्या सेवनामुळे जेवण पचायला मदत होते.
थोडे नवीन जरा जुने