प्रेम प्रकरणामुळे अल्पवयीन मुलीला वडिलाने काठीने बेदम मारहाण करत ठार मारले !


जत : जत तालुक्यातील अंकले येथे गावातील मुलाबरोबर असलेल्या प्रेम प्रकरणातून काठीने मारहाण करून वडीलाने मुलीचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी जत पोलिसानी वडीलाला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, मयत जागृती बाबासाहेब उर्फ दादासाहेब यमगर (वय १७) हिचे गावातीलच एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण होते. गावतील मुलाबरोबर असलेले प्रेम प्रकरण बंद कर म्हणून वडील बाबासो यमगर हिने जागृतीला अनेकदा सांगितले. 

याच कारणावरून सोमवारी रात्रीच्या सुमारास मयत जागृती व वडील बाबासो यांच्यात वाद झाला. मुलगी ऐकत नसल्याने वडील बाबासो याने मुलगी जागृतीला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत जागृती ही गंभीर जखमी झाली. 

तिला तातडीने कवठेमहांकाळ येथे उपचारासाठी दाखल केले पण तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी दादासो लक्ष्मण पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडील बाबासो यमगर याच्याविरुद्ध मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जत पोलिसांनी वडील बाबासो यमगर यास अटक केली.
थोडे नवीन जरा जुने