नासलेल्या दुधाचे पाणी फेकून देऊ नका, हे आहेत याचे खास फायदे !


दुध नासले आणि तुम्ही ते फेकून देण्याच्या तयारीत असत तर पाच मिनिट थांबा. नासलेल्या दुधापासून ज्याप्रकारे पनीर तयार केले जाते ठीक त्याचप्रमाणे नासलेल्या दुधाचे पाणीसुद्धा खूप उपयोगी ठरते. 

आज आम्ही तुम्हाला नासेलेल्या दुधाचे फायदे आणि हे दुध फेकून का देऊ नये या संदर्भात खास माहिती देत आहोत.

पीठ तिंबण्यासाठी आणि गेव्ही बनवण्यासाठी


पीठ तिंबण्यासाठी आणि गेव्ही बनवण्यासाठी पाण्याएवजी नासलेल्या दुधाचे पाणी वापरू शकता. हे पाणी टाकलेल्या पिठापासून तयार केलेल्या पोळ्या नरम राहतील आणि यामधून प्रोटीनसुद्धा मिळेल. ग्रेव्ही आंबट-गोड बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो, अमचुल, चिंच किंवा दह्याचा वापर करत असाल तर याऐवजी नासलेल्या दुधाचा वापर करून पाहा. यामुळे ग्रेव्ही निश्चितच आणखी टेस्टी होईल.


उपमा किंवा सूपमध्ये टाका

नासलेल्या दुधाच्या पाण्याची चव एकदम लाइट असते आणि हे पाणी उपमा करताना टाकल्यास उपम्याची चव आणखीनच चांगली होईल. उपमा टेस्टी बनवण्यासाठी टोमॅटो किंवा दही टाकण्याएवजी नासलेल्या दुधाचे पाणी वापरल्यास उत्तम टेस्ट येईल. सूप बनवण्यासाठीसुद्धा या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता.


सौंदर्य खुलवण्यासाठी

नासलेल्या दुधाच्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल आणि आतून स्वच्छ होते. या पाण्यामध्ये अँटी मायक्रोबियाल गुण असतात जे त्वचेचा pH बॅलेंस संतुलित ठेवतात.


केसांसाठी फायदेशीर

नासलेल्या दुधाच्या पाण्याने केसांना शॅम्पू केल्यानंतर पुन्हा याच पाण्याचे केस धुवा आणि 10 मिनिटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतील.


पाळीव प्राण्यासाठी हेल्दी डाएट

तुमच्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याला एक्स्ट्रॉ प्रोटीन देण्यासाठी त्याच्या खाण्यामध्ये नसलेल्या दुधाचे पाणी मिसळा.


घराच्या बागेत लावलेल्या झाडांना नासलेल्या दुधाचे पाणी टाका.यामुळे झाडांना पोषण मिळेल. पंरतु हे पाणी दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये मिसळून झाडांना टाकावे. कारण हे पाणी अ‍ॅसिडीक असते आणि यामुळे झाड जाळण्याची शक्यता राहते.
थोडे नवीन जरा जुने