जाणून घ्या गॅस्ट्रो म्हणजे नेमके काय?


सामान्यपणे ‘स्टमक फ्लू’ म्हणून ओळखला जाणारा गॅस्ट्रो इंटेरायटिस सहसा विषाणूंमुळे (रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरस) होतो. हे विषाणू म्हणजे डायरियाचे, विशेषत: लहान मुलांमधील डायरियाचे सर्वाधिक आढळणारे कारण आहे. 

काहीवेळा ई. कोली जीवाणू, कॅम्पिलोबॅक्टर किंवा सॅलमोनेला प्रादुर्भाव यांमुळेही गॅस्ट्रोइंटेरायटिस होऊ शकतो. हे जीवाणू सामान्यपणे कमी शिजवलेल्या अन्नपदार्थातून, विशेषत: मटण व चिकन-अंडी यातून पसरतात. त्यामुळे हे अन्नपदार्थ स्वच्छ करताना व शिजवताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.

गॅस्ट्रोइंटेरायटिसची प्रमुख लक्षणे म्हणजे डायरिया आणि उलटय़ा. याचा परिणाम म्हणून पुढे शुष्क त्वचा, तोंडाला कोरड पडणे, डोके हलके वाटणे आणि सारखी तहान लागणे ही डिहायड्रेशनची लक्षणेही जाणवू लागतात. 

प्रादुर्भाव झाल्यानंतर एक दिवसाने ही लक्षणे सहसा जाणवू लागतात आणि आठवडाभर जाणवत राहतात किंवा कदाचित आणखी काळही जाणवू शकतात.

>> डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ घेणे : पाणी पिणे सर्वात उत्तम. काही फळांचे रस, शहाळ्याचे पाणी वगैरेही पिऊ शकतात. अर्थात, सॉफ्ट ड्रिंक्स आणि मद्य टाळले पाहिजेत.

>> विश्रांती : वारंवार रेस्ट-रूमला जावे लागल्याने थकल्यासारखे वाटते. डिहायड्रेशन आणि अशक्तपणामुळेही असेच होते. तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पूर्ण बरे होत नाही, तोपर्यंत कष्टाची कामे किंवा व्यायाम करणे टाळा.

>> आहार : उन्हाळ्याच्या दिवसात पचनक्रिया सोपी व्हावी म्हणून नेहमी हलका आहार घेणेच उत्तम. सूप, भात, वरण आदी साधे अन्नपदार्थ थोडे थोडे खा. तळलेले, मसालेदार पदार्थ किंवा जंक फूड टाळा.
थोडे नवीन जरा जुने