अशा प्रकारे शरीरात उपयोगी पडते अँटीऑक्सिडंट,जाणून घ्या फायदे !


सूज कमी होते - नियमित आहारात अँटीऑक्सिडंटची कमतरता असेल तर सूज आणि अन्य प्रकारचे आजार होऊ शकतात. निसर्गातून मिळणा-या अँटीऑक्सिडंटचा औषध म्हणून वापर होतो. अँटीऑक्सिङट ऑक्सिकरणाच्या प्रणालीला ठिक करतात. या प्रक्रियेमुळे सूज कमी होते. 

हृदयाला रोगमुक्त करतात - 

अँटीऑक्सिडंट हृदय रोगाला घातक असणा-या फ्री रॅडिकल्सला सामान्य अवस्थेत आणतात. अँटीऑक्सिडंट हृदय रोगाला जबाबदार असणा-या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक नियंत्रण ठेवतात. डोळ्यांना निरोगी ठेवतात. अँटीऑक्सिडंट वयाबरोबर डोळ्यांवर होणा-या दुष्परिणामांच्या धोक्याला २५ टक्क्यांनी कमी करतात. क जीवनसत्त्वाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मोतीबिंदूपासून संरक्षण करतात.

मधुमेहाला नियंत्रित ठेवण्यास साहाय्यक - फ्री रॅडिकल्समुळे मधुमेहाचा धोका वाढतो, तसंच अतिरिक्त ग्लूकोज घेण्यानेही पेशी खराब होतात. ज्यामुळे मधुमेह होतो. संशोधनानुसार, अँटीऑक्सिडंट या स्थितीला नियंत्रित ठेवतात, अँटीऑक्सिडंटच्या सेवनाने मधुमेहानंतर होणाया अन्य समस्यांचा धोका कमी होतो.

एका संशोधनादरम्यान हे स्पष्ट झाले आहे की, पॉलिफिनॉल्स आपल्या रक्तातील शर्करेची पातळी कमी करतात. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक यामध्ये असणारं क जीवनसत्त्व आणि ई जीवनसत्त्व पेशींना सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वृद्धावस्थेत आपल्या मेंदूची शिकण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी व स्मरणशक्तीचं कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी कुएरसेटिन नावाचं अँटीऑक्सिडंट कमालीचं ठरतं. मेंदूच्या नसामध्ये होणा - या आजारांची जोखीम दूर करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट अतिशय साहाय्यक ठरतं.
थोडे नवीन जरा जुने