‘आय लव्ह यू' न बोलताही अशा प्रकारे करा प्रेम व्यक्त !बऱ्याचदा जोडीदाराला ‘आय लव्ह यू’ म्हटलं की प्रेम व्यक्त झाले, असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा समज पूर्ण चूकिचा असून, केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणण्यानेच प्रेम व्यक्त करता येते असे नाही. तर प्रेम व्यक्त करण्याचे इतरही काही मार्ग आहेत.

प्रेमाने मीठी मारा
प्रेम व्यक्त करण्यासाठी तोंडाने ‘आय लव्ह यू’ म्हणण्यापेक्षा जोडीदाराला मिठी मारा. तुमचे हे वागणे त्याला प्रचंड आवडू शकते. इतकेच नव्हे तर मिठी मारल्यामुळे तुम्हाला रिझल्टही पटकन मिळतो. तूम्ही जेव्हा जोडीदाराला मिठी मारता तेव्हा, जर त्यानेही तितक्याच तिव्रतेने तुम्हाला मिठी मारली तर समजून जा की तुमची भावना पोहोचली आहे. जर मिठी मारली नाही तर समजा की, तो त्या वेळी तुमच्यासोबत अनकंफर्टेबल फील करतोय. त्याच्या मनात त्या वेळी दुसरा विचार आहे.

चूंबन घेऊन सुरूवात करा
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या जोडीदाराच्या ओठांवर ओठ ठेऊन एक छानसा किस घ्या. तुमचा एक किस जोडीदाराला दिवसभर खूश ठेऊ शकतो. दिवसाची चांगली सुरूवात करून तुम्ही त्याच्या किती जवळ अहात ते दाखवू शकता.

मनासारखा नाष्टा बनवा
आनंदी जीवनाचा मार्ग पोठातूनच जातो. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्याच्या मनासारखा आवडत्या पदार्थाचा नाष्टा करून दिला तरीही तो खूप खूश होतो. तुमचे हे सरप्राईझ गिफ्ट पाहून तो खूश होऊन जाईल.

आभार माना
खरेतर घरात फॉर्मेलिटी पाळायच्या नसतात. पण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी विशेष काही गोष्ट केली असेल, तर थॅंक्यू म्हणा. तूम्ही थॅंक्यू म्हणाल तर जोडीदार काहीसा रागवेल. पण तो राग लटका असेल. त्याला आतून खूप आनंद झालेला असतो. म्हणून तो म्हणेल थॅंक्यूची गरज नाही.

प्रेमळ स्पर्श
स्पर्श ही गोष्ट अशी आहे की, ती तुमच्या भावना न बोलता जोडीदारापर्यंत पोहोचवते. स्पर्श हा दोघांना जवळ आणन्यास मदत करतो. अनेकदा तुमच्यातील मोठी भांडनेही स्पर्शामुळे मिटतात. अनेकदा स्पर्शामुळे भांडनाचा शेवट गोड प्रेमात होतो.

संदेश द्या
जोडीदाराच्या अचानक हाती लागेल अशा ठिकाणी ‘आय लव्ह यू’ लिहीलेला संदेश लपवून ठेवा. हा संदेश हाती लागताच तुमचा जोडीदार लाजून चूर होईल. अशा वेळी तुम्ही जर घरी नसाल तर तुम्हाला नक्कीच घरून फोन येईल किंवा तुम्ही घरी परत जाल तेव्हा तुमचे आनंदाने स्वागत होईल. जर तुम्ही घरी असाल तर तुमच्या गळ्यात मिठी तर पडेलच पडेल.

सार्वजनीक ठिकाणी प्रेम कबूल करा
तुम्हाला सार्वजनीक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे जमत नसेल तर कबूल नक्कीच करा. सार्वजनीक ठिकाणी तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेमाणे अधिकार गाजवत असेल, तुमचा हात पकडत असेल, तुमच्या शरीराल खेटून उभारत ही व्यक्ती केवळ माझी आहे, असे दाखवत असेल तर जोडीदाराला तसे करू द्या. तो असे करत नसेल तर तुम्ही करायचा प्रयत्न करा. कारण अशा वागण्यातून आपल्या प्रेमाची जाहीर कबूली मिळत असते. पण लक्षात ठेवा सार्वजनीक ठिकाणी प्रेम कबूल करणे किंवा व्यक्त करणे म्हणजे जोडीदारावर ओरडणे नव्हे.

वीकेंडचे प्लानिंग करा
आठवड्यचा शेवट एकत्र राहून साजरा करा. त्यासाठी खास प्लानिंगही करू शकता. एखादे हॉटेल, पर्यटनस्थळ, चित्रपट असे काहीही चालेल. यांमुळे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल.

संपर्कात रहा
तुम्ही कामानीमित्त बाहेरगावी असाल. ऑफिसमध्ये असाल तर लंचब्रेक, किंवा अधून मधून दिवसातून किमान दोन तिन वेळा फोन किंवा एसएमएस करा. संपर्कात राहणे हाही प्रेम व्यक्त करण्याचाच एक भाग आहे.
थोडे नवीन जरा जुने