"हे" उपाय लठ्ठपणा कमी करण्यासाठी नक्कीच ठरतील फायदेशीर !


लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. यामुळेच डायबिटीज, हायब्लडप्रेशर यासारखे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. 

विशेष बाब म्हणजे आदिवासींमध्ये ही समस्या खुप कमी प्रमाणात आढळते. त्यांची जिवनपद्धती आणि वनऔषधी आजारांना त्यांच्या आसपासही फिरकू देत नाही. 

आज असेच काही निवडक हर्बल उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे आत्मसात करुन तुम्ही शरिराची चरबी कमी करु शकता. हे उपाय आत्मसात करून तुम्ही तुमची जिवनशैली नियंत्रित करु शकता.

लठ्ठपणा कमी करण्याचे घरगुती उपाय -
कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते. उत्तर मध्यप्रदेशातील आदिवासी लोक शेवग्याची भाजी वजन कमी कराण्यासाठी प्रभावी असल्याचे मानतात.

गुळ डिंक पाण्यातून दिवसातून दोनदा घेतल्याने वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते.


गाजराचे भरपूर सेवन करावे कारण आधुनिक विज्ञानानेही गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मान्य केले आहे.

मध एक काम्पलेक्स साखर आहे, जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खुप फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने फायदा होतो. काहीजण याच मिश्रणात एक चमच लिंबू रस टाकून पितात. दोन्ही उपाय फायदेशीर आहेत. काहीजण केवळ लिंबू पाणी आणि मध पिऊन दिवसभर उपवास करतात. हा प्रभावी देशी उपाय आहे.


सुंठ, दालचिनी, आणि काळी मिरी (3ग्रॅम प्रत्येकी) एकत्र करुन त्याची बारीक पूड करा. या पुडीचे दोन भाग करा. पाण्यासोबत सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा असे प्या.
ताजी पत्ता कोबी ही वजन कमी करायला मदत करते. ताजी पत्ता कोबी बारिक करुन तिचा रस बनवुन रोज सकाळी घेतल्याने चरबी कमी होत असल्याचे आदिवासी सांगतात. आधुनिक विज्ञानही या बाबीला पुष्टी देते. पत्ता कोबी साखर आणि इतर कार्बोहाइड्रेटसची चरबी होण्यापासून रोखते आणि वजन कमी करते.


अर्धा चमचा सोप एक कप उकळत्या पाण्यात टाकून 10 मिनिटे उकळून थंड झाल्यावर सलग तिन महीने प्यायल्यास वजन कमी होईल.


पुदीन्याची हिरवी चटणी पोळीसोबत खाल्ल्याने फायदा होतो. आदिवासी पुदिना टाकून चहा पिण्याचा सल्ला देतात. हिरडा किंवा बेहडा यांच्या फळांचे चुर्ण एक एक चमचा 50 ग्रॅम पडवळाच्या रसासोबत (1 ग्लास) मिसळून घेतल्याने वजन खुप लवकर कमी होते आणि थकवाही निघून जातो.
थोडे नवीन जरा जुने