केस उगविण्यासाठी हे आहेत प्रभावी उपाय, जाणून घ्या !

अनेक तरूणांना टक्कल पडल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाची कमीही जाणवते. केसगळती आणि टक्कलाच्या समस्येपासून वाचण्यासाठी जगभरात उपचार सुरू आहेत. काहींनी त्यावर प्रभावी मार्गही शोधले आहेत. परंतु, घरगुती उपायांपासूनही टकलावर प्रभावी उपाय करता येतात. कसे? ते जाणून घ्या खालील टीप्सच्या माध्यमातून….


मेहंदीची पाने घेऊन त्याचा ज्यूस तयार करा. त्यात नारळाचे गरम तेल प्रमाणात मिसळा. हे मिश्रण साधारण 10 मिनिटांपर्यंत ठेऊन द्या. त्यानंतर या मिश्रणाने डोक्याला हलका मसाज द्या.

ऑलिव तेल गरम करून ते डोक्यावर लाऊन ठेवा. हे तेल डोक्यावर अर्धा तास ठेवा. त्यानंतर शांपूने डोके धुवा.

काद्यांचा रस काढा. तो एका हवाबंद डब्यात किंवा बॉटलमध्ये भरा. कमीत कमी दोन हप्त्यांतून एकदा डोक्याला कांद्याच्या रसाने मसाज करा. हा रस केसांच्या मुळाशी जाईल असा हलका मसाज करा.

नारळाचे तेल आणि दूध एकत्र मिश्रण करा आणि केसांना लावा फायदा होतो.

2 चमचे मधात 1 चमचा दालचीनी पावडर मिसळा. हे मिश्रण केसांना लावा. साधारण 20 मिनीटानंतर केस धुवा.

महत्त्वाची टीप – हे सर्व उपाय करताना खबरदारी घ्या. तुम्हाला एखाद्या पदार्थाची एलर्जी असू शकते. त्यामुळे हे उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थोडे नवीन जरा जुने