सायनसने ग्रस्त आहात का?अशा प्रकारे लक्षणे ओळखा आणि नियंत्रण मिळवा !



सायनसची (अस्थिविवर) समस्या थंडीच्या दिवसांत अधिक निर्माण होते. अशावेळी पीडितास शिंक येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, डोके किंवा डोळ्यांवर दबाव जाणवणे, हलका ताप येणे आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. 


त्यामुळे पीडिताने खाणेपिणे आणि जीवनशैलीबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जाणून घेऊया.

फ्रिजमध्ये ठेवलेले कोणतेही खाद्यपदार्थ काढून लगेचच खाऊ नये. कारण सायनस असलेल्या लोकांसाठी असे करणे घातक ठरू शकते.

आहारात मिठाचा वापर जास्त प्रमाणात करू नये. कारण मिठामुळे उतींमध्ये द्रव एकत्र होऊ लागते. अशावेळी सायनस इन्फेक्शन आणखी वाढू शकतो. 

तळलेले, मसालेदार, स्टार्चयुक्त, तांदूळ तसेच मैद्यापासून बनवलेले केक, पाय, मॅक्रोनी यासारखे खाद्यपदार्थ आणि साखर किंवा कँडी यापासूनही दूर राहणे गरजेचे आहे. 

भरपूर ‘अ’ जीवनसत्त्व असलेले दूध, दही, काशीफळ, पालेभाज्या, टोमॅटो आणि पपईचे सेवन करावे. दुधातून भरपूर कॅल्शियम मिळते आणि सायनस असलेल्यांसाठीही हे फायदेशीर आहे.

पीडिताने शिळे अन्न खाऊ नये. 200 मिली पालकाच्या ज्यूसमध्ये 300 मिली गाजराचा रस मिसळून सेवन केल्यानेही सायनस असलेल्यांसाठी फायदा होतो.
थोडे नवीन जरा जुने