यौन शक्ती वाढविण्यासाठी काही उपयोगी आसनतुमचे वैवाहिक जीवन बेरंग झाले असेल तर योग तुमच्या सेक्स संबंधीच्या समस्यांना सोडविण्यासाठी मदत करू शकतो. जाणून घ्या असे योगासनं जे वैवाहिक जीवनासाठी खूप फायदेशीर आहेत.


योग न केवळ तुम्हांला शारीरिक उर्जा आणि मनाला शांतीच देत नाही तर तुमच्या बेरंग वैवाहिक जीवनाला रंगाने फुलवून टाकतो. तणाव आणि इतर कारणांमुळे वैवाहिक जीवनात यौन इच्छा कमी होते. त्यामुळे तुम्ही तुमची सेक्स लाइफ चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकत नाही.

पण तुमचे वैवाहिक जीवन बेरंग झाले असेल तर योग तुमच्या सेक्स संबंधीच्या समस्यांना सोडविण्यासाठी मदत करू शकतो. सेक्स दरम्यान तुम्ही लवकर थकत असाल किंवा अशाच प्रकारची समस्या आहे. तर बुवा बाबा आणि हकीमच्या मागे लागू नका, नियमित योग करण्याची सवय लावून घ्या.

चला जाणून घेऊ या योगचे असे दमदार पाच योगासने जी तुमची यौन शक्ती वाढवून वैवाहिक जीवनात सुखांचा वर्षाव होऊ शकतो. 

यौन शक्ती वाढविण्यासाठी काही उपयोगी आसन

पद्मासन

लैंगिक समस्या दूर करण्यासाठी पद्मासन एक खूप सोपे योगासन आहे. या योगासनातून सेक्स पावर वाढण्यात मदत होते. यात शरीराचे स्नायू, मूत्राशय आणि पोटावर ताण निर्माण होतो, त्यामुळे या भागांची मजबूती वाढते. यामुळे बसण्याची जागाही लवचिक होते.
हलासन

हलासन नियमित केल्याने आपल्या शरिरात हळूहळू बदल दिसून येतात. हे आसन केल्याने पुरूष आणि महिलांची संपत चाललेली सेक्सची ऊर्जा वाढू लागते.

सेतूबंधासन

हे नाव दोन शब्दांना मिळून तयार केले जाते. सेतु आणि बंध.. या योगाला नियमित केल्याने यौन शक्ती वाढते. महिलांच्या व्हजायनल स्नायू मजबूत होतात. हे आसन करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा आणि गुडघे बेंड करून कमरेपर्यंत उचला. या पोजमध्ये ३० सेंकद राहा मग कमरेला जमिनीवर टेकून रिलॅक्स व्हा.

प्लँक

या पोजमुळे मनात यौन विश्वास निर्माण होतो. हे आसन पाठीच्या स्नायूवर काम करते. वरील शरीर मजबूत करून सहनशक्ती निर्माण करतो. यामुळे स्टॅमिना वाढू शकतो.

भुजंगासन

या आसनाला कोबरा पोज म्हणतात, हे आसन सरळसरळ तुमच्या अंडाशय आणि गर्भाशयाच्या आरोग्याला फायदा निर्माण होता. हे आसन तुमचे मासिक धर्म चक्राला योग्य करण्यात मदत होते. तसेच स्त्रियांच्या विकारांना दूर करण्यातही मदत होते. ही मुद्रा पुरूषांमध्ये वेळेआधी स्खलन होण्याच्या समस्येतून दिलासा देते. 
थोडे नवीन जरा जुने