थंडीतही चमकदार राहू शकतो चेहरा, करा ही तीन योगासने!


सर्वांगासन :कसे करावे : पाठीवर झोपून पाय एकमेकांजवळ ठेवावेत. तळहात शरीराच्या जवळच जमिनीवर पालथे ठेवावेत. विपरीतकरणीप्रमाणेच दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता सरळ वर उचलावेत व त्याच लयीमध्ये कंबरही उचलावी. तत्काळ तळहातांचा आधार कंबरेस द्यावा. कंबरेला मस्तकाच्या दिशेने झुकवावे व पाय मस्तकाच्या मागे न्यावेत जेणेकरून मस्तक व धड यांचा जवळ जवळ ९० अंशांचा कोन होईल. हनुवटी छातीला टेकवावी. डोळे मिटावेत किंवा दृष्टी पायांच्या अंगठ्यांवर स्थिर करावी. नैसर्गिक श्वसन सुरू ठेवावे.

मांडया, पोट, कंबरेचे स्नायू सशक्त होतात.
गळ्यावर दाब पडल्याने कंठस्थ अंत:स्रावी ग्रंथींना अधिक रक्तपुरवठा होतो.
 या आसनाने पचनशक्ती व स्मरणशक्ती वाढते.
 दिवसभर मन ताजेतवाने व प्रफुल्लित राहते.
 ज्ञानेंद्रिये अधिक कार्यक्षम होतात.
 वृद्धत्व लवकर येत नाही.
 थकवा नाहीसा होतो.

सावधगिरी: पाठीचे व कंबरेचे जुनाट दुखणे, मानेचा विकार, कंठातील दाह, डोकेदुखी, सर्दी, कानांचा विकार, उच्चरक्तदाब, दोन मणक्यांमधील चकती सरकणे यांपैकी कोणताही विकार असल्यास सर्वांगासन करू नये.

योग
फायदे
योगासनांमुळे बरेच फायदे होतात. नियमित योगा केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. शिवाय कोणत्याही संसर्गाचा धोका राहत नाही. खाली दिलेल्या आसनामुळे त्वचेवरील मुरुम, डाग दूर होतात.शिवाय हिवाळ्यातील तत्वचेचा काेरडेपणा दूर करून चेहरा चमकदार होतो.

सिंहासन
सर्वात प्रथम वज्रासनमध्ये बसा. दोन्ही गुडघे शक्य तितके रुंद ठेवा. दोन्ही हात गुडघ्यादरम्यान ठेवा. दोन्ही हात सरळ ठेवून पुढे वाका. डोके सरळ ठेवा. शक्य तितके तोंड उघडा. जीभ बाहेर काढा. आपले डोळे उघडे ठेवा. आता नाकातून श्वास घ्या आणि तोंडावाटे आवाज काढत सोडा. पुन्हा वज्रासनमध्ये बसा.

मत्स्यासनकसे करावे : पाठीवर झोपून पद्मासन घालावे किंवा आधी पद्मासन घालून मग पाठीवर पडावे. कोपरांच्या मदतीने मस्तक व धड वर उचलून मागे वाकवावे जेणेकरून पाठीची कमान होईल. मस्तकाचा वरचा भाग जमिनीवर ठेवावा. पाठीची कमान तशीच सांभाळून दोन्ही तर्जन्यांनी त्या-त्या बाजूच्या पायांचे अंगठे पकडावेत. दोन्ही कोपर जमिनीवरच राहतील. शरीर शिथिल ठेवावे. श्वास कोंडून ठेवू नये. आसनाच्या अंतिम स्थितीत डोळे मिटले तरी चालेल. १० ते २० सेंकद आसनात स्थिर राहावे. आसनस्थितीतून बाहेर येताना आधी अंगठे सोडून पाठ सरळ करावी. हातांचा आधार घेऊन उठून बसावे व पद्मासन सोडावे. पायांचे अंगठे पकडता येत नसल्यास हातांचे पंजे मांडीवर ठेवावेत.

सावधगिरीपाठीच्या कण्याला मागे वळवून ठेवताना मस्तकाच्या वरच्या भागावर, तसेच मानेवरही भार पडतो म्हणून आसनाचा कालावधी हळूहळू वाढवावा. मस्तकाखाली टॉवेलची पातळ घडी करून ठेवावा. शरीर शिथिल ठेवावे. मत्स्यासनानंतर सर्वांगासन करावे.

फायदे त्वचेची चमक वाढते. थंडीत होणारा कोरडेपणा दूर होतो.
 स्मरणशक्ती वाढते. घशाचे आजार दूर होतात.
 छाती आणि पोटाचे आजार दूर हाेतात.
 सर्दी-खोकला होत नाही.

मानेवर आलेला ताण याने नाहीसा होतो.
हा ताण कंठापाशी पडतो. त्यामुळे तेथील रक्ताभिसरण वाढते.
डोळे, कान तसेच गलग्रंथींचे कार्य सुधारते. उदरात वायू साठल्याने दुखत
असल्यास त्रास कमी होतो.
कृमींचा त्रास होत नाही. फुप्फुसांची क्षमता वाढते.
पाठीचा कणा लवचिक होतो.
थोडे नवीन जरा जुने