जाणून घ्या,अचानक चक्कर आल्यांनतर कोणते घरगुती उपचार करावे !


चक्कर आल्यांनतर कोणते घरगुती उपचार करावे याविषयी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, परंतु सर्वात पहिले हे जाणून घ्या की चक्कर येणे म्हणजे काय. कधीकधी एखाद्या व्यक्तीला चक्कर येते, थोडावेळ बसून उठल्यानंतर डोळ्यांसमोर अंधार पसरतो. 

तुमच्या चारही बाजूच्या वस्तू गरागरा फिरताना दिसतात. हे सर्वकाही तेव्हा घडते, जेव्हा डोक्यामध्ये रक्ताची पूर्ती कमी होते. रक्तदाब अचानक कमी झाल्यानंतरसुद्धा ही परिस्थिती निर्माण होते. 

घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही यावर उपचार करू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, चक्कर आल्यानंतर कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात...

1. चक्कर येत असल्यास तुळशीच्या पानांच्या रसामध्ये साखर मिसळून हे मिश्रण घ्यावे किंवा तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास चक्कर येणे बंद होईल.

2. वारंवार चक्कर येत असल्यास धने पावडर दहा ग्रॅम तसेच आवळा पावडर दहा ग्रॅम एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. यामुळे चक्कर येणे बंद होईल.

3. अचानक चक्कर आल्यास अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन लवंगा टाकून पाणी उकळून घ्या आणि थंड झाल्यानंतर हे पाणी प्यावे. हे पाणी प्यायल्याने लाभ होईल.

4. 10 ग्रॅम आवळा, 3 ग्रॅम काळी मिरी आणि 10 ग्रॅम बत्ताशे बारीक करून घ्या. 15 दिवस नियमितपणे या मिश्रणाचे सेवन केल्यास चक्कर येणे बंद होईल.

5. ज्या लोकांना काही कारण नसताना चक्कर येण्याच त्रास असेल त्यांनी दुपारच्या जेवणाच्या 2 तास आधी आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचे ज्यूस घ्यावे. दररोज ज्यूस घेतल्यास चक्कर येणे बंद होईल. परंतु या ज्यूसमध्ये कोणत्याही प्रकराची साखर आणि मसाला टाकू नये.

6. नियमितपणे नारळ पाणी घेतल्यास चक्कर येणे बंद होईल.

7. चहा आणि कोफी कमी प्रमाणात घ्यावी. जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी घेतल्यास चक्कर येतात.

8. 20 ग्रॅम मनुका शुद्ध तुपामध्ये भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये काळे मीठ मिसळून खाल्ल्यास चक्कर येणे बंद होईल.

9. खरबूजमधील बिया बारीक कुटून तुपात भाजून घ्या. त्यानंतर हे चूर्ण थोड्या-थोड्या प्रमाणात दररोज सकाळ-संध्याकाळ घ्या. यामुळे चक्कर येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
थोडे नवीन जरा जुने