अशा प्रकारे ऑफिसमध्ये हेल्थ मेन्टेन करू शकता !


कामाचा ताण बराच असल्याने बरेच जण खाण्याकडे दुर्लक्ष करत असतात. काही जणाचे काम हे बैठे असल्यामुळे सकाळी एकदा बसल्यानंतर सध्याकाळपर्यंत खुर्चीतून उठत देखील नाही. तुमचे काम जरी पुर्ण होत असेल तरी पण एका जागेवर सतत बसणे आरोग्यासाठी हनिकारक ठरते.

या तुमच्या सततच्या बसण्याने तुम्हाला मानेचा त्रास,पाठीचा त्रास या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये हेल्दी फुड सोबतच थोड्याफार प्रमाणात स्ट्रेचनिंग देखील केले पाहिजे.

यासाठी दर दोन तासांनी तुम्ही तुमच्या कामाच्या खुर्चीवरून उठले पाहिजे आणि एक चक्कर मारली पाहिजे. हे केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मद्त होईल.
थोडे नवीन जरा जुने