भारतीय वंशाच्या दोन महिला न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीश !


न्यूयाॅर्क भारतीय वंशाच्या २ महिलांना न्यूयाॅर्क सिटीमध्ये न्यायधीशपदी नियुक्ती देण्यात आली आहे. अर्चना राव यांना गुन्हे न्यायालय देण्यात आले आहे. तर दीपा अंबेकर यांना दिवाणी न्यायालयात पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे .अर्चना राव यांची सुरुवातीला जानेवारी २०१९ मध्ये दिवाणी न्यायालयात नियुक्त करण्यात आले होते. त्या गुन्हे न्यायालयात काम पाहात होत्या. नियुक्ती होण्याआधी त्यांनी १७ वर्षे न्यूयॉर्क काऊंटी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नीच्या कार्यालयात काम केले होते. 

अर्चना वासर कॉलेजच्या पदवीधर आहेत. फोर्धाम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉमधून न्यायिक डॉक्टरची पदवी घेतली. न्यायाधीश दीपा यांना प्रथम मे २०१८ मध्ये दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्या गुन्हे न्यायालयात कार्यरत होत्या. मिशिगन विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. रटगर्स लॉ स्कूलमधून त्यांनी न्यायिक डॉक्टर पदवी घेतली.
थोडे नवीन जरा जुने