मौन पाळाल तर जीवन उजळून जाईल...


मौन हे प्रत्येकाजवळ असलेले एक गुप्त शस्त्र आहे. याची ताकद ओळखून कोणीही यश मिळवू शकतो. यामुळे मनाला शांती आणि आनंद मिळतो. दैनंदिन जीवनात याचा अभ्यास करून नक्कीच आपण उत्तम जीवनाच्या दिशेने जाऊ शकतो. हल्लीच्या वेगवान जीवनात संभाषणाशिवाय एकमेकांशी संपर्क साधता ये नाही. तरीही मौनाद्वारे रोजच्या अनेक समस्यांचा गुंता सहजतेने सोडवता येतो.  संभाषणाला प्राधान्य देणारे मौनाचा संबंध पलायन वा पराभवाशी जोडतात; परंतु मौन शंभर वाक्यांवर प्रभावी पडू शकते.


बऱ्याचदा भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द सुचत नसतात. अशा वेळी एखादा अयोग्य शब्द बोलल्यास होणाऱ्या गोष्टी बिघडू शकत असतात. अशा वेळी गप्प बसणे उत्तम असते. तसेही भावनाविवश स्थितीत मौनच प्रबळ असते. जे कोणाच्याही जीवनावर न पुसला जाणारा ठसा उमटवून जाते. ध्वनी प्रदूषणाच्या स्फोटक स्थितीवर उभ्या असलेल्या जगात मौन मनावर मलमासारखे काम करीत असते. याशिवाय याचे अनेक व्यावहारिक गुणही आहेत. याचा उपयोग करून अनेक गुंतागुंतीच्या परीस्थितीमधून  बाहेर पडता येते. एवढेच नव्हे तर हे बऱ्याचदा तर्क-वितर्कापेक्षा धारदार शस्त्रही सिद्ध होते. जेथे तर्क अपुरे पडतात तेथे मौनाचा विजय होतो. यासाठी नातेवाईक, मित्रांशी वागता- बोलताना एका मर्यादेनंतर गप्प राहण्यातच हुशारी असते. या गुणांशिवाय मौन बाहेरच्या जगातील नवी स्थिती जाणण्याची व स्वत:मध्ये डोकावण्याची संधीही आहे. मौन राहून आपण आपले अंतर्मन वाचू शकतो.

 आपले गुण आणि दोष ओळखण्यासाठी मौनासारखे दुसरे साधन नाही. या प्रकियेतून जाऊन आपण सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व मिळवू शकतो. आत्ममंथनाव्यतिरिक्त  मौन परीस्थितीशी सामंजस्य राखायलाही मदत करते. नोकरी देणारे बडबड्या कर्मचाऱ्यापेक्षा शांत स्वभावाचे कर्मचारीच जास्त पसंत करतात. घर असो व ऑफिस आपण गप्प राहूनच आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकतो.  जर एका मर्यादेपर्यंत मौनाला आपल्या जीवनात स्थान दिले तर आपण आपल्या मुख्य समस्या समजू शकू व त्या सोडवण्यात सक्षम होऊ शकतो. मन व शरीर संयमित राखण्यासाठी आपल्या पूर्वजांनी मौनाचेच एक रूप ” ध्यान ” निवडले. ज्याचा मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यात उपयोग होतो.  आपल्या ऋषींनी शांतीचे महत्त्व जाणूनच आठवड्यातील एक वा दोन दिवसांचे मौन पाळायला सांगितलं आहे .
थोडे नवीन जरा जुने