हे पेय रोज सकाळी रिकाम्यापोटी नियमित प्यायल्याने शरिराची चरबी जलद कमी होईल
जुन्या जमान्यापासून लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी, मध आणि लहसूनचा काढा पित आहेत. हे प्यायल्याने शरिराचे मेटाबॉलिज्म जलद होते. हे पेय रोज सकाळी रिकाम्यापोटी नियमित प्यायल्याने शरिराची चरबी जलद कमी होते.

कोणताही व्यायाम किंवा डायटिंग न करता बारीक असणारे लोक खूप लकी असतात. पण प्रत्येक जण यांच्यासारखा नसतो. अनेक जण जीममध्ये खूप घाम गाळतात आणि आपल्या खाण्यापिण्यावर खूप कंट्रोल करतात तरी त्यांच्या पोटाची चरबी वाढलेली असते. बाहेर निघाले पोट कोणालाही आवडत नाही. हे कमी करण्यासाठी लोक क्रॅश डायटिंग करतात.

क्रॅश डायटिंग आणि स्लिमिंग प्रॉग्राम केवळ काही दिवसांसाठी फायदेशीर असतो. या गोष्टी तुम्हांला काही काळासाठी रिझर्ल्ट देतात. हे बंद झाल्यावर पुन्हा पोट दुप्पट वेगाने पुन्हा पुढे येते आणि तुम्ही जाड दिसू लागतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही हेल्दी आणि नॅचरल पद्धतीचा वापर केला पाहिजे. हे केल्याने तुमच्या शरिरात जमा होणारे टॉक्सिन बाहेर पडण्यात मदत होते आणि तुम्ही लवकर बारीक होण्यात मदत होते. जुन्या जमान्यापासून लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी, मध आणि लहसूनचा काढा प्यायचे. याचा परिणाम चांगला दिसू यायचा. हे प्यायल्याने शरिराचे मेटाबॉलिज्म जलद होते, तसेच एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात.

रोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ले पाहिजे आणि त्यानंतर हेवी ब्रेकफास्ट केला पाहिजे. जाणून घ्या कसे काम करते हे ड्रिंक...

कच्चा लसूण

कच्च्या लसुणामध्ये खूप मोठ्या प्रमाणआत अँटीऑक्सीडेंट असते, हे मधामध्ये मिक्स करून घेतल्यास लठ्ठपणा सहज कमी होतो. या दोघांना एकत्र मिळून खाल्यास शरिरातील घाण बाहेर पडते. हे मिश्रण एक प्रकारे डिटॉक्स मिश्रण आहे.

कसे कराल सेवन...

तुम्ही याला अनेक प्रकारे खाऊ शकतात, याला गरम पाण्यात मध, कोरपड, लिंबूचा रस, अॅपल साइडर व्हिनेगर किंवा कोणत्याही प्रकारच्या हर्बल चहामध्ये मिसळून त्यासोबत कच्चा लसूण खा. हे मिश्रण दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाले तर त्याचा अधिक फायदा होतो.

या गोष्टीची काळजी घ्या...

लसणाच्या ४ पाकळ्यापेक्षा अधिक खाऊ नका. जास्त खाल्ल्यास त्याचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. हे नियमित खाल्ल्यास तुमच्या शरिरातील एक्स्ट्रा चरबी कमी करण्यात मदत होते. तसेच तुम्हांला डायटमध्येही सुधार करणे गरजेचे आहे आणि योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे.
थोडे नवीन जरा जुने