स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून बचाव करण्यासाठी "ह्या" काही उपयुक्त टिप्स.


शरीराच्या सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर पीडितास दिवसभर अस्वस्थ वाटते. अशावेळी त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. जाणून घेऊया स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून कसा बचाव करावा आणि वेदनेपासून कशी सुटका करावी.

संगीत

संगीत ऐकल्याने वेदनेपासून सुटका होते, असे एका फ्रेंच संशोधनात आढळले आहे. ‘द इंटरनॅशनल र्जनल ऑफ नर्सिंग’ने कर्करोगपीडितांवर केलेल्या प्रयोगात आढळले की, जे पीडित 30 मिनिट संगीत ऐकत होते, त्यांच्या वेदना 50 टक्क्यांनी कमी झाल्या. तज्ज्ञांच्या मते, संगीत ऐकल्यानंतर मिळणार्‍या आनंदामुळेच वेदनेकडे पीडिताचे दुर्लक्ष होते.


मालिश करा

वेदना झाल्यास बामने थोडेसे चोळा. बाममध्ये असलेला पुदिन्याचा सार व कापुराने पेन फायबर्सचे सेन्सर्स ब्लॉक होतात. त्यामुळे वेदना कमी होतात. तसेच चोळल्यामुळे रक्तप्रवाहही सुरळीत होतो.


मॅग्नेशियम

मॅग्नेशियमची कमतरता असल्यासही स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. तज्ज्ञांच्या मते, भरपूर मॅग्नेशियम असलेल्या केळी, भुईमूग, अँव्होकॅडो, सर्व प्रकारचे धान्य व सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन केले पाहिजे. आंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ मिसळा. त्यामुळेही वेदना कमी होतील.


वर्कआऊट

योगासने, थाय-ची व वॉकिंग अशा एक्झरसाइजमुळे वेदना कमी होऊ शकतात. ज्यांच्या जीवनशैलीत वरीलपैकी एका व्यायामाचा समावेश असतो, त्यांचे स्नायू नेहमी रिलॅक्स राहतात.
थोडे नवीन जरा जुने