शृंगार करणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच कानातील आभूषणाने असे खुलवा तुमचे सौंदर्य


शृंगार हा स्त्रियांचा आवडता विषय. अनेकदा या विषयावरून स्त्री आणि पुरुषांमध्ये वाद सुद्धा होत असतात. शृंगार करणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच मानला जातो. कानात घातल्यामुळे आपले संपूर्ण दिसणेच बदलते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला योग्य वाटतील असे कानातले आभूषण घालणे गरजेचे आहे.

आपल्या सौदर्य शास्त्रामध्ये १६ शृंगार सांगितले आहेत. कानात कुंडल घालणे हे १त्यापैकी एक मानले जाते. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न कार्यास हजेरी लावणे आणि त्याचे इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यास अनेकजणी काही ना काही करत असतात. कानातील शृंगार करून आपण किती सुंदर आणि आकर्षक दिसू यासाठी तुमच्यासाठी काही टिप्स आपण बघणार आहोत.

लोंबकाळणारे – ज्यांचा चेहरा आयताकृती आहे, अशांनी लांब कानातले घातल्याने चेहरा आणखीच उभट वाटू शकतो. त्यामुळे त्यांनी असे कानातले घालू नये.

विविध आकार – सध्या मौल्यवान धातूपेक्षा वेगवेगळ्या फँन्सी कानातले घालण्याची फॅशन आहे. गोल, आयताकृती, चौकोनी अशा प्रकारातले कानातले सध्या लोकप्रिय आहेत. त्यात डायमंडचाही प्रकार येतो.

स्टड्स – सध्या कानात घालण्यासाठी सर्वात चालणारा प्रकार म्हणजे स्टड. हे कानातले कोणालाही सूट होतात. पार्टीवेअर असोत किंवा फॉर्मल आऊटफिट हे कानातले चांगलेच दिसतात.

पंखाचे कानातले – तुम्ही जर पारंपारिक वस्त्र परिधान करणार असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. हे कानातले एकदम हटके आकारात येतात. साडी असेल किंवा पंजाबी किंवा जीन्स हे कानातले कशावरही सूट होतात.
थोडे नवीन जरा जुने