केस पांढरे होण्यामागे "हे" पण एक कारण असू शकते?


‘मेडिकल मिथ्स डेट किल यू’च्या लेखिका नॅन्सी एल. सिडरमॅन म्हणतात की, अतिताण नक्कीच पीडिताचे अंतर्गत व बाह्य पातळीवर नुकसान करतो.

तणावामुळेच फ्री रॅडिकल्सची संख्या वाढते आणि निरोगी पेशींचे नुकसान होते. मात्र, तणावामुळेच केस पांढरे होतात, यास काहीही वैज्ञानिक आधार नाही. भोजनात पोषक घटकांचा अभाव आणि आनुवंशिक कारणांमुळेही असे होते.

कमी प्रकाशात वाचन डोळ्यांसाठी हानिकारक आहे - घरातील ज्येष्ठ नेहमी सांगत असतात की, कमी प्रकाशात वाचल्याने दृष्टीवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, कमी प्रकाशात वाचल्याने डोळ्यांवर दबाव पडतो.


यामुळे डोकेदुखी, डोळे लाल वा कोरडे होऊ शकतात. मात्र, डोळ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होत नाही.रात्री पुरेशी झोप घेऊन वरील लक्षणांपासून सुटका होऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने