एकटेपणा हा माणसाच्या आयुष्यावर उठू शकतो


एका नव्या संशोधनानुसार, एकटेपण हे जे लोकं अनुभवतात त्याचं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय हृदयासंबंधी निगडीत समस्या उद्भवण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे एकटेपणा अनुभवणाऱ्यांचं आयुष्य हे इतरांच्या तुलनेनं कमी असतं.

एकटेपणा हा माणसाच्या आयुष्यावर उठू शकतो. हे गेल्या काही दिवसांतील अनेक घटनांमधून दिसून आलं आहे. अनेकदा आपण मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात असतो पण त्यावेळी देखील आपण स्वत:ला एकटं असल्याचं समजतो. आपल्या आरोग्याशी निगडीत अशा अनेक समस्या असतात ज्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. अशावेळी एकाकीपणा ही आपली सर्वात मोठी समस्या होऊ शकते.

एका नव्या संशोधनानुसार, एकटेपण हे जे लोकं अनुभवतात त्याचं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय हृदयासंबंधी निगडीत समस्या उद्भवण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे एकटेपणा अनुभवणाऱ्यांचं आयुष्य हे इतरांच्या तुलनेनं कमी असतं. असं या सर्व्हेत म्हटलं आहे.

एकटेपणा आणि चिंता

एकटेपणा यामुळे मृत्यूचं प्रमाण दुप्पट होऊ शकतं. इतरांच्या तुलनेत एकटेपणा अनुभवणारे स्त्री आणि पुरूष हे सर्वाधिक चिंताग्रस्त असतात. त्यामुळे यांच्या आयुष्यातील गुणवत्ता स्तरातही घट होत जाते.

एकटेपणाने हृदयरोगाची शक्यता

कोपेनहेगन विद्यापीठ रुग्णालयातील डॉक्टरेटची विद्यार्थींनी एनी विनगार्ड यांच्या मते, 'एकटेपणा हे हृदयासंबंधी समस्यांना आमंत्रण देतं. त्यामुळे अशा लोकांचं आयुष्य लवकरच संपू शकतं.'

हे संशोधन वार्षिक नर्सिंग काँग्रेस यूरोहार्टकेअर २०१८ मध्ये मांडण्यात आलं. यातून एक गोष्ट समोर आली आहे की एकटेपणा अनुभवणाऱ्या अनेक लोकांमध्ये हृदय रोग, एरिथिमिया यासारख्या समस्या जास्त आहेत.

एकटेपणा ही भावनाच अशा लोकांना प्रचंड त्रासदायक ठरतं. त्यामुळेच अशा लोकांचा मृत्यू लवकर ओढावण्याचे प्रमाण जास्त आहे.
थोडे नवीन जरा जुने