कायम चिरतरुण दिसण्यासाठी, आयुर्वेदातील 'हे' उपाय लक्षात ठेवा !


धावपळीच्या जीवनामुळे अनेक तरूणांनाचे आरोग्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍यामुळे उतार वयात अनेक अजारांचा सामना करावा लागतो. वेळे आधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष यासारख्‍या आजाराचा सामना करावा लागतो. 

या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगण्‍यात आले आहेत. या उपचाराचा योग्‍य वापर केल्‍यास तुम्‍हाला चिरंजीव होता आले नाही तरी तुम्‍ही चिरतरूण मात्र होऊ शकता. यासाठी मात्र तुम्‍हाला काही उपाय करावे लागतील.

रोज करा हे उपाय-

आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व मिश्री प्रत्येकी 15-15 ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. हा उपाय तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.

दररोज डाळींबाचे सेवन केल्‍यास अकाली प्रोष्‍ठत्‍व येत नाही, तारूण्यावस्था दिर्घकाळ राहते. डाळींबाचे सेवन रक्तासंबंधीच्या अनेक आजारांपासून शरीराला वाचवते. तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हे उपाचार सुरू करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

संतुलित आहार घ्या-

दररोज संतुलित आहार घ्यावा. आहार असा घ्या जो पचण्यास हलका असावा. आहार असा घ्‍या ज्‍यामुळे शरिराच्या पाचनसंस्थेवर वाईट परिणाम होवू नये. खाण्यात विटामिन, प्रोटीन आणि खनिज तत्वांचे जास्तीत जास्त प्रमाण हवे. बाहेरचे खाद्य, तेल, तुप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.
तणावापासून दूर राहा...

जी व्यक्ती जास्त विचार करते आणि खुप ताण घेते, अशा व्‍यक्तिला अनेक आजार तारूण्यावस्थेतच व्हायला लागतात. जर मानसिक त्रास जास्त असेल तर चांगल्या मित्रांमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होण्यास मदत होईल. जर तणाव दूर झाला तर अनेक रोगांपासून तुम्ही वाचाल.

लसूनचा वापर-

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसनाच्या दोन पाकळ्या गिळाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे. असे नियमित केल्‍याने अशक्तपणाच्या समस्येपासून तुम्ही लवकर बाहेर याल.

आवळ्याचा वापर

शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याच्या चुर्णात मिश्री वाटून मिसळावी. या मिश्रणाला दररोज एक चमचा या मात्रेत रात्री झोपण्याच्या पहिले सेवन करावे. यानंतर थोडे पाणी प्यावे. आवळ्याचा मुरंबा नियमित घ्यावा त्यामुळेही शरिरातील अशक्तपणा कमी होतो.


पांढर्‍या मुसळीचा वापर-

अशक्तपणा दूर करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे. पांढर्‍या मुसळी अथवा धोली मुसळीचे चुर्ण बनवावे. हे चूर्ण एक चमचा आणि एक चमचा वाटलेली मिश्री एकत्र करून घ्यावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्या आधी कोमट दुधासोबत याचे सेवन करावे. असे केल्याने शरिराला शक्ती मिळते आणि सर्व दैनंदिन कार्य करण्यासाठी शरिराला उर्जा मिळते.

साय आणि मिश्रीचा उपाय

दुधाची साय आणि वाटलेली मिश्री यांना एकत्र करून याचे नियमित सेवन करावे. असे केल्याने अशक्तपणा दर होतो आणि दिर्घ कालावधीसाठी शरीरात शक्ती राहते. तसेच चेहर्‍यावर तेज येते.


या गोष्टी लक्षात ठेवा -

दररोज झोपे वेळेवर घ्‍या. झोप कमी होण्याने अनेक आजार होतात. दररोज कमीत कमी 6 ते 8 घंटे झोपणे आवश्यक आहे.

सकाळी लवकर उठायला हवे आणि रात्री योग्य वेळी झोपयला हवे.

दिवसा अथवा संध्याकाळी झोपू नका. जर कोणी आजारी आहे अथवा वृद्ध आहे, तर अशा व्यक्तीने दिवसा झोपलेले चालेल. मात्र तरूण आणि निरोगी माणसाने दिवसा झोपू नये. अवेळी झोपल्यानेही अनेक आजार होऊ शकतात.

दररोज सकाळी व्यायाम करावा. योगासनामुळे अधिक काळ तरूण राहता येते. शरीर निरोगी आणि उर्जावान बनते. सकाळी फिरणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
थोडे नवीन जरा जुने