स्वतः मधे करा 'हे' बदल ऑफिसमधील प्रश्न सुटतील लवकर....


भावनांवर नियंत्रण - कामाच्या ठिकाणी कधीही भावनांचा विस्फोट होता कामा नये. त्यातून तुम्ही तुमचे विचार संवादातून योग्य प्रकारे पोचवू शकत नाही असा संदेश जातो. जी व्यक्ती स्वतःचे विचार दुस-यांपर्यंत पोचवण्यास असमर्थ असते ती चांगली लीडर होऊ शकत नाही असे मानले जाते. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता तेव्हा स्थिर मनाने आणि शांतपणे काम करणे अपेक्षित असते.

ठामपणा आणि अतिघाई - तुमच्यातील ठामपणा तुमचा आत्मविश्वास आणि निर्णयशक्ती दर्शवतो. त्याउलट तुम्ही स्वतःचे मत सांगण्यात किंवा स्वतःला व्यक्त करण्यात खूप घाई करत असाल तर त्यातून तुम्हाला धीर धरवत नसल्याचे किंवा तुम्ही घाबरला असल्याचे दिसून येते. वागण्यात ठामपणा असला पाहिजे म्हणजे सदासर्वकाळ तुमचेच बरोबर आणि तेच झाले पाहिजे असे नाही. तुमच्या बॉसबरोबरील किंवा सहकायांबरोबरील नात्याला धक्का न लागता नकार देण्याचे तंत्र तुम्हाला जमले पाहिजे.

दुसऱ्यांच्या कामाचे क्रेडिट घेणे- ऑफिसमध्ये काम करत असताना दुस-याच्या कामाचे किंवा कल्पनांचे क्रेडिट घेणे पूर्णतः अशोभनीय असते.

सहकार्यांची नावे माहीत नसणे -
तुमच्याबरोबर काम करणा-यांची नावे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही इतरांकडे किती लक्ष देता असा प्रश्न निर्माण होतो, त्याचवेळी अशा वागण्यातून फक्त स्वतःल महत्त्व देण्याची अहंकारी वृत्ती दिसून येते.
अशांतीचा स्वीकार करा
थोडे नवीन जरा जुने