जाणून घ्या ! पायात सोने घालणे योग्य आहे कि अयोग्य...


आपण अनेकदा पाहिलं आहे की स्त्रिया हातात, गळ्यात सोन्याची दागिने घालून आपला अलंकार जपते. तर त्याच बरोबर पायात चांदीची पैंजण घालून वावरते. तशा अनेक पद्धती हिंदू धर्मात आहेत. त्या प्रत्येकामागे काही ना काही कारणं आहेत. ते जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी…

हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत. भारतात विविध धर्माचे लोक राहत असल्याने प्रत्येक धर्माच्या चालीरिती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मात तुम्हाला माहीत आहे का पायात सोनं का घातलं जात नाही ते?

सोन हे उष्णतावर्धक आहे तर चांदीही शीतवर्धक मानले जाते. आयुर्वेदानुसार मनुष्याचे डोके थंड आणि पायात उष्णता निर्माण झाली पाहिजे. 


यासाठीच गळ्यामध्ये तसेच हातात सोने घातले जाते तर पायात चांदी घातली जाते. सोने उष्णवर्धक असल्याने ती उष्णात पायात जाईल आणि डोकेही थंड राहील.

पायात चांदी घातल्याने अनेक आजारांपासूनही दूर राहतो. चांदीच्या पैंजण घातल्याने पाठ, गुडघेदुखीसारखे त्रासांपासून सुटका मिळते. 

त्यामुळे एकाबाजूने अलंकाराचं देणं तर दुसरीकडे प्राकृतीक काळजी या दोन्ही गोष्टी सांभाळून घेणं गरजेचं आहे.
थोडे नवीन जरा जुने