आजच्या धावपळीच्या युगात "अशी" घ्या आपल्या मुलांची काळजी !


मुलांच्या आरोग्याबाबत पालक चिंताग्रस्त असतात. मुले आजारी पडण्याची अनेक कारणे शाळेतच असतात याची मात्र पालकांना जाणीव नसते. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी याची माहिती पालकांना घेणे गरजेचे आहे.

आहारात जिवाणू 

लहान मुलांसाठी सकाळीच पॅक केलेले जेवण ‘टेंपरेचर डेंजर झोन’पर्यंत पोहोचू शकते. म्हणजे मुलांची जेवणाची वेळ होईपर्यंत जेवणात फूडबोर्न बॅक्टेरियाची उत्पत्ती होऊ शकते. मुलांना शाळेच्या वेळेवरच जेवणाचा डबा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवण तयार करताना स्वच्छतेची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.


मानसशास्त्र
मुलांना प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी जबाबदार ठरवल्यास त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांना जर मानसिकदृष्ट्या बळकट करायचे असेल तर पालकांनी आधी त्यांना सुरक्षेचा विश्वास द्यायला हवा. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागेल, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. असे केले तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.


पाठदुखी
हेवी बॅक पेनमुळे प्रत्येक तीन मुलांपैकी एक मुलगा पाठदुखीने पीडित असतो. दप्तराचे वजन मुलाच्या एकूण वजनाच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, ही बाब पालक आणि शाळा व्यवस्थापनाने नेहमीसाठी लक्षात ठेवावी. मुलांनी दप्तर दोन्ही खांद्यावर घेतले पाहिजे. असे केल्यास मुलांचा पाठदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.


स्वच्छ हात
एका संशोधनानुसार की-बोर्डवर टॉयलेट सीटच्या तुलनेत 60 टक्के जास्त जिवाणू असू शकतात. त्यामुळे जेवण करण्यापूर्वी आणि खास करून संगणक विषयाचा तास झाल्यानंतर हात स्वच्छ धुण्यास आपल्या पाल्यांना अवश्य सांगितले पाहिजे. यामुळे लहान मुलांना हानिकारक जिवाणूंपासून बचाव करता येणे शक्य होईल.


अ‍ॅलर्जी
मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कारण, त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. सर्दी-खोकला झालेल्या मुलांमुळे वर्गातील इतर मुलांनाही सहजपणे अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे मुले आजारी असल्यावर त्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये. त्यांना सर्दी-खोकला असलेल्या इतर मुलांपासून दूरच राहण्याचा सल्ला द्यावा.
थोडे नवीन जरा जुने