कंडिशनर लावल्यानंतरही जर तुमचे केस रफ राहत असतील तर हे करा..


कंडिशनर लावल्यानंतरही जर तुमचे केस रफ राहत असतील तर याचा अर्थ तुम्ही कंडिशनर चुकीच्या पद्धतीने वापरत आहात. आपण आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. त्यात बऱ्याचदा कंडिशनरचाही वापर केला जातो. पण कंडिशनर लावल्यानंतरही जर तुमचे केस रफ राहत असतील तर याचा अर्थ तुम्ही कंडिशनर चुकीच्या पद्धतीने वापरत आहात. 

कंडिशनर लावल्याने आपले केस चांगले राहतील असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण की, कंडिशनर योग्य पद्धतीने लावणंही तितकंच गरजेचं आहे.

केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत :

- कंडिशनर लावण्यापूर्वी याची खात्री करून घ्या तुमच्या केसांना शॅम्पू लावलेला नाही. शॅम्पूने केस स्वच्छ धुतल्यानंतरच कंडिशनर कायम लावावा.

- सुरुवातीला आपल्या हातावर थोडंसं कंडिशनर घ्या, दोन्ही हात एकमेकांवर चोळावेत आणि त्यानंतरच ते आपल्या केसांमध्ये लावावे.

- कंडिशनर लावताना केसांना वरपासून खालपर्यंत हळूहळू मसाजही करावा.

- कंडिशनर लावल्यानंतर केस तात्काळ धुवू नयेत. थोडावेळ कंडिशनर केसांना राहू द्यावं आणि त्यानंतरच केस धुवावेत.

- कंडिशनर लावल्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. जोवर केस मोकळे होत नाहीत तोवर केस धुवावेत.
थोडे नवीन जरा जुने