'हे' आहेत काही खास उपाय,अल्कोहलचा प्रभाव ताबडतोब कमी करण्यासाठी !


गरम पाण्याने स्नान करा

हँगओव्हरमधून बाहेर पडण्यासाठी सकाळी गरम पाण्याने स्नान करावे. गरम पाण्याने स्नान केल्याने घाम येईल आणि यामुळे शरीरात जमा झालेले अल्कोहल कमी होईल. जर तुम्ही स्नान करण्याच्या स्थितीमध्ये नसाल तर वाफ घेऊ शकता.


मध

मधाचे सेवन करून तुम्ही हँगओव्हरमधून बाहेर पडू शकता. मधामधील फ्रुक्टोज तत्व शरीराच्या आतील अल्कोहलच्या प्रभावाला नष्ट करण्यात सहायक ठरते. ड्रिंक केल्यानंतर डोकं दुखणे चक्कर येणे आणि उलटी, मळमळ सुरु होते. मधामुळे अल्कोहलमध्ये उपलब्ध असलेले एसिटेल्डिहाईड नामक तत्वाचा प्रभाव हळू-हळू कमी होऊन हँगओव्हर दूर होते.


ब्लॅक कॉफी 

सकाळची गरमागरम एक कप ब्लॅक कॉफी हँगओव्हरमधून बाहेर पडण्यास मदत करेल. कॉफीमध्ये आढळून येणारे कॅफीन तत्व अल्कोहलचा प्रभाव कमी करते.


बनाना शेक

केळीचे ज्यूस घेतल्यास हँगओव्हर कमी होते. ड्रिंक केल्यानंतर शरीरातील पोटॅशियम कमी होते. केळीमधील उपलब्ध पोटॅशियम शरीरातील ही कमरता भरून काढते आणि हँगओव्हर कमी करण्यास सहायक ठरते.


नारळ पाणी

नारळ पाण्यामध्ये शुगर आणि कार्बोहायड्रेटचा स्तर खूप कमी असतो. यासोबतच हे 99 टक्के फॅट फ्री असून यामध्ये मिनरल आणि इलेक्ट्रोलेट्स आढळून येते. जे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत. अल्कोहल घेतल्याने शरीरातील पाण्याची लेव्हल कमी होते.
थोडे नवीन जरा जुने