महाविकास आघाडीत बिघाडी, कॉंग्रेस चा 'हा' मंत्री पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही !


मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णय कळवणार आहेत.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती. तर कोल्हापुरातील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अहमदनगरचे पालकमंत्रिपद सुपूर्द करण्यात आले आहे.

मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी विनंती ते करणार आहेत.
थोडे नवीन जरा जुने