'हेल्दी फूड'चा योग्य अर्थ तुम्हाला माहित आहे का ?


पाकीटबंद खाद्यपदार्थांत कोणकोणते घटक किती मात्रेत आहेत याची माहिती पाकिटावर दिली जाते, परंतु लेबलवर लिहिलेले हे शब्द योग्य अर्थाने समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे आरोग्य आणि आवश्यकतेनुसार पाकीटबंद खाद्यपदार्थ विकत घेण्यात मदत होते.

कोलेस्ट्रॉल फ्री...

याचा अर्थ असा होत नाही की, पाकीटबंद खाद्यपदार्थांत कोलेस्ट्रॉलची मात्रा अजिबात नाही. प्रत्येक सेवनात 2 मिलीग्रॅमपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल आणि 2 ग्रॅमपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्स असतो. लो कोलेस्ट्रॉलचा अर्थ प्रत्येक सेवनात 20 मिलीग्रॅमपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल आणि दोन ग्रॅमपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्स असा होतो. कोलेस्ट्रॉल शरीरात तयार होते. मांस, मासे, डेअरी उत्पादने, अंडे, बटरमध्ये कोलेस्ट्रॉल असते, तर प्लान्ट बेस्ड उत्पादनांमध्ये नसते. दररोज 300 मिलीग्रॅम किंवा कमी कोलेस्ट्रॉलचे सेवन केल्याने नुकसान होत नाही.
जाणून घ्या शुगर फ्रीपासून ते कॅलरी फ्री/ झिरो कॅलरीज पाकीटबंद खाद्यपदार्थ संदर्भातील विशेष माहिती...

लेस कोलेस्ट्रॉल...

यात फॅट्स असतील; परंतु प्रमाणित उत्पादनांच्या तुलनेत त्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी असेल. उदा- अमुल आइस्क्रीमच्या 100 मिली पाकिटात 18.9 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असेल, तर कमी कोलेस्ट्रॉलच्या उत्पादनात फॅट्सचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी असेल.


शुगर फ्री...

‘शुगर फ्री’ लिहिलेल्या पाकिटात साखरेचे प्रमाण अजिबातच असते असे नाही. याच्या प्रत्येक सेवनात 0.5 मिलीग्रॅम इतके साखरेचे प्रमाण असते. यात कॅलरी आणि काबरेहायड्रेट असतात. कॅलरीज कमी करण्यासाठीच्या शुगर फ्री उत्पादनांत शुगर अल्कोहोल टाकले जाते. त्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते.


ट्रान्सफॅट फ्री..

ट्रान्सफॅटला ‘हिडन फॅट’ ही म्हटले जाते. याच्या प्रत्येक सेवनात 0.5 ग्रॅम फॅट असते. हे सामान्य फॅट्सपेक्षा अधिक घातक असतात. हे फॅट्स कमी करण्यासाठी डॉक्टर कमी जेवण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनामुळे वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, तर चांगल्या कोलेस्ट्रॉलचा र्‍हास होतो. यामुळे हृदयविकार, मधुमेह, कर्करोगासारखे रोग होण्याची शक्यता बळावते. यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजेही नसतात.


नो कलर, नो प्रिझव्र्हेटिव्ह...

यामध्ये कोणतेही कलर अथवा प्रिझव्र्हेटिव्ह नसते. डाबर इंडिया फूड्सचे विभागप्रमुख प्रवीण जयपुरियार यांच्या मते रिअल आणि रिअल अँक्टिव्ह ज्युसमध्ये कोणतेही प्रिझव्र्हेटिव्ह नसतात. त्यामुळेच असे पदार्थ उघडून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर पाच दिवसांच्या आत संपवावे, असे सांगितले जाते. सहास्तरीय पॅकेजिंगमुळे सील उघडण्याआधी सामान्य तापमानात ठेवले जाते.


नो अ‍ॅडेड शुगर...

कॅलरी आणि काबरेहायड्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात ‘नो अ‍ॅडेड शुगर’ उत्पादने घेतली जातात. याचा अर्थ संबंधित उत्पादन संपूर्णत: कॅलरी किंवा काबरेहायड्रेट फ्री असतात असे नाही. अशा उत्पादनांत माल्टोडेक्सट्रिन, काबरेहायड्रेट असतात. फळ, दूध, भाजीपासून तयार उत्पादनात आधीपासूनच साखर असते.
अनस्वीटन्ड : गोड बनवण्यासाठी यात एक्स्ट्रा शुगर किंवा स्वीटनर टाकले जात नाही.


फॅट फ्री...

याचा अर्थ संबंधित खाद्यपदार्थ पूर्णत: फॅट फ्री असा नसून प्रत्येक सेवनात 0.5 ग्रॅम असा होतो.

एनर्जी

या लेबलमुळे शरीरास मिळणार्‍या एनर्जीची माहिती मिळते. ती किलो ज्यूल किंवा किलो कॅलरीजमध्ये मोजली जाते. पुरुषांना दररोज 2500, तर महिलांना 2000 किलो कॅलरीची आवश्यकता असते.

ऑल नॅचरल : याचा अर्थ शंभर टक्के नॅचरल असा होत नाही, तर यात रंग, कृत्रिम गंध किंवा सिंथेटिक घटकांचे प्रमाण कमी असते.


कॅलरी फ्री, झिरो कॅलरीज...

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन अ‍ॅक्ट 2011 नुसार कॅलरी फ्री याचा अर्थ, प्रत्येक सेवनात 5 कॅलरी असा होता. लो कॅलरीज म्हणजे प्रत्येक सेवनात 40 किंवा त्यापेक्षा कमी कॅलरी. उदा. डाएट कोकच्या 250 मिलिलिटर बॉटलमध्ये 105 कॅलरीज असतात.

सर्व्हिंग साइज...

पाकिटावर सेवन आकार (सर्व्हिंग साइज) दिलेला असतो. हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाकिटावर आहाराबद्दलही माहिती दिलेली असते. सेवन आकाराकडे दुर्लक्ष केल्यास इतर माहितींचा काहीच उपयोग नसतो. यामुळे कॅलरी आणि आहाराचे प्रमाण लक्षात येते. ‘सर्व्हिंग पर पॅकेट’ यावरून पाकिटातील खाद्यपदार्थांतून किती सर्व्हिंग साइज मिळेल हे लक्षात येते. उदा- पाकिटावर दोन सर्व्हिंग साइज आणि 5-सर्व्हिंग पर पॅकेट असा उल्लेख असेल, तर एका पाकिटातील खाद्यपदार्थाचे दहा कप आणि पाच वेळा सेवन असा अर्थ होतो.


उत्पादनाचे वजन, रंग किंवा प्रकार सौम्य असेल असा याचा अर्थ होत नाही, तर प्रमाणित उत्पादनांच्या तुलनेत कॅलरी, फॅट आणि सोडियमचे प्रमाण 30 ते 50 टक्यांनी कमी असते; परंतु फॅट्स, कॅलरी किंवा कोलेस्ट्रॉल असतेच.
थोडे नवीन जरा जुने